Kolhapur News: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या इचलकरजींतील महाविकास आघाडीतील नेत्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चिंता लागली आहे.
आगामी इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वपक्षीय सज्ज झाले असले तरी महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये अद्याप निर्णय झालेला नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एकत्र लढवावी का स्वतंत्र लढवावी. शिवाय शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी, याबाबत काँग्रेस नेते सतेज पाटील यांची भेट घेतली. सध्या त्यावर कोणता निर्णय झाले नसल्याने सतेज पाटीलच त्यावर मध्यम मार्ग काढणार आहेत.
इचलकरंजीला महापालिका घोषित केल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर आगामी निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचे एकमत आघाडी मधील नेत्यांनी घेतले होते. मात्र राज्यातील नेत्यांची मते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वतंत्र लढण्यावर ठाम असल्याने इचलकरंजी मधील नेत्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांची कोल्हापुरात भेट घेऊन चर्चा केली.
शाहू विकास आघाडी म्हणून एकत्र येत ही निवडणूक लढवण्याचा मानस महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केला आहे. मात्र ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या 22 तारखेच्या सुनावणीनंतरच त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. निकालानंतर कोणत्याही क्षणी या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीला रोखण्यासाठी इचलकरंजीतील महाविकास आघाडीतील नेत्यांची एकजूट झाली आहेत.
ही निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवायची यावर देखील चर्चा झाली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची तुतारी ही घरोघरी पोहोचल्याचा दाखला माजी आमदार राजीव आवळे यांनी देत ही निवडणूक तुतारी चिन्हावर लढवावी, अशी सूचना केली. तर लोकसभा निवडणुकीत मशाल घरोघरी पोहोचल्याचे सांगत ही निवडणूक लढवण्याची मते व्यक्त केली.
महाविकास आघाडी म्हणून अनेक नेत्या आपल्या संपर्कात आहेत. जर महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणार असाल तर ही निवडणूक आपण एकत्र लढूया. मात्र त्यासाठी आपण सोबत राहणार का? असा सवाल सतेज पाटील यांनी करत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अंतिम निर्णय घेण्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.