Kolhapur Zilla Parishad Teachers Sarkarnama
महाराष्ट्र

Teachers News: डोंगरी, दुर्गम शाळांना मिळणार गुरुजी! कोल्हापूर जिल्ह्यात 410 शिक्षकांची नियुक्ती

Kolhapur Zilla Parishad Teachers: पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या ४१० प्राथमिक शिक्षकांची कोल्हापूर जिल्हा परिषदेत नियुक्ती होणार आहे. समुपदेशनानंतर डोंगरी आणि दुर्गम शाळांना शिक्षक मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

Mangesh Mahale
  1. 410 नवनियुक्त शिक्षकांची समुपदेशनानंतर नियुक्ती होणार.

  2. डोंगरी व दुर्गम शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरणार.

  3. ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळून शिक्षण व्यवस्थेला दिलासा.

Kolpur News: पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या ४१० प्राथमिक शिक्षकांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेत पदस्थापनेसाठी उपस्थिती नोंदवली आहे. या सर्व नवनियुक्त शिक्षकांना येत्या गुरूवारी (ता.१० रोजी)समुपदेशन केले जाणार आहे.

यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून दुर्गम भागातील शिक्षणाची अवस्था बिकट झाली होती. तर अनेक विद्यार्थ्यांना डोंगरदर्‍यातून प्रवास करून शेजारच्या शाळेत शिक्षणासाठी जावे लागत होते.

शासनाच्या पवित्र पोर्टल मार्फत कोल्हापूर जिल्हा परिषदेला पहिल्या टप्प्यात ४४५ उमेदवारांच्या निवडीची शिफारस करण्यात आली होती. त्यापैकी ४१० शिक्षकांनी कागदपत्र पडताळणीसाठी आपली उपस्थिती नोंदवली.

शिफारस झालेले ३५ उमेदवार गैरहजर राहिले .मराठी माध्यमातील १६८ शिक्षक, इंग्रजी माध्यमातील ६ शिक्षक, मराठी माध्यमातील विज्ञान विषय शिक्षक १००, भाषा विषय शिक्षक १२४ तर इंग्रजी माध्यमाचे विज्ञान विषय शिक्षक १२ अशा एकूण ४१० शिक्षकांना प्रत्यक्ष शाळेत आता नियुक्ती दिली जाणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये अनेक दिवसांपासून शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त होती.या समुपदेशनादरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रिक्त पदांचे प्रमाण समान राखले जाणार आहे.

गुणानुक्रमानुसार उमेदवारांना बोलावून त्यांच्या पसंतीक्रमानुसार शाळा निवडण्याची संधी दिली जाईल. शिक्षकांच्या या समुपदेशनामुळे ज्या तालुक्यांमध्ये सर्वाधिक रिक्त जागा होत्या, अशा दुर्गम आणि डोंगरी भागातील शाळांना आता हक्काचे शिक्षक मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार असून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT