Shinde-Thackeray Politics: Sarkarnama
कोकण

Shinde-Thackeray Politics: शिंदेंना धक्का: योगेश कदमांचा कट्टर समर्थकाचा ठाकरे गटात प्रवेश..

सरकारनामा ब्युरो

Shinde-Thackeray Politics: गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत जंगी सभा झाली होती. या सभेला उत्तर देण्यासाठी आज ठाकरे शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीच्या खेडमध्ये सभा घेणार आहेत.पण या सभेपूर्वीच शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक आणि दापोली नगपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

राज्यातील महासत्तांतरापासून राज्यभरातून ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. ठाकरे गटातील आणखी काही आमदार शिंदे गटात जाणार असल्याचाही दावा देखील शिंदे गटातील नेते करत असतात. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र वेगळंच चित्र आहे.दापोलीचे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक आणि दापोली नगपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर यांनी ठाकरे (Uddhav Thackeray) गटात प्रवेश केला आहे.

प्रशांत पुसाळकर हे आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक मानले जातात.पण कुसाळकरांनीच ठाकरे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर खूप अराजकता माजली आहे. पण ठाकरे गटाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा माझा मानस आहे. माझ्यावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शिंदे गटाशी आता माझा कोणताही संपर्क नाही. राज्यात भाजपकडून जे काही ब्लॅकमेलिंग सुरु आहे, त्याला रोखून जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करायचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच, राज्यातील संत्तांतरानंतर मी शिंदे गटात सक्रीय झालो होतो,पण बदलत्या परिस्थिती पाहता मी प्रामाणिकपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असंही त्यांनी म्हटलं आहे. माजी आमदार सुर्यकांत दळवी आणि संजय कदम यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

कोण आहेत प्रशांत पुसाळकर

२०१६ च्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडूण आले २०२१ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली पण पराभव झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT