Aditya Thackeray-Bharat Gogawale  Sarkarnama
कोकण

Thackeray Vs Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी सतत तोंड उघडणारे ‘या’ गोष्टीवर गप्प का?; आदित्य ठाकरेंचा गोगावलेंवर निशाणा

Shivsena News : पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळू शकले नाही.

सरकारनामा ब्यूरो

Mumabi News : रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आस लावून बसलेले आणि त्यासाठी सतत तोंड उघडणारे मुंबई-गोवा हायवे वरच्या खड्ड्यांबाबत मात्र गप्प का? गेली ७-८ वर्ष एनएचएआय (NHAI) हा प्रश्न का सोडवू शकत नाही? की हेही मुद्दाम चाललंय? सहनशील कोकणवासीयांना त्रास देण्यासाठी? असे सवाल युवा सेनेचे प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता आमदार भरत गोगावले यांना विचारले आहेत. (Aditya Thackeray criticizes MLA Bharat Gogawle)

महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. गोगावले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळू शकले नाही. मात्र, मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल आणि रायगडचा पालकमंत्री मीच होणार, असा दावा गोगावले करीत आहेत. त्यावरूनच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी गोगावले यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे सर्वजण विकास विकास म्हणत असले तरी रायगडच्या पालकमंत्रीपासाठी तोंड उघडणारे या महामार्गावरील रायगडच्या आसपासचे खड्डे मात्र हे बुजवू शकलेले नाहीत. राष्ट्रीय महामार्ग या मार्गावर गेली सात ते आठ वर्षे काम करू शकलेले नाही. ते यांना अजून दिसलेले नाही. ते केंद्र सरकारकडे बोट दाखवू शकले नाहीत, एवढी हिम्मत त्यांच्यात नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे.

ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, दरवर्षी गणेशोत्सवासाठी लाखो कोकणवासीय जीव मुठीत घेऊन, त्रास सहन करत ह्याच रस्त्यांवरुन प्रवास करतात. आत्ताही गणेशोत्सव तोंडावर असताना हे महाराष्ट्रद्रोही हा प्रश्न गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. महाराष्ट्रावर ह्यांचा एवढा राग का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT