Asaduddin Owaisi Sarkarnama
कोकण

Asaduddin Owaisi : ओवेसींची जीभ छाटा अन् 'हे' बक्षीस घेऊन जा; कोणी केलं आवाहन?

BJP MLA Nitesh Rane On AIMIM Asaduddin Owaisi : AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईनचा नारा दिला.

Jagdish Patil

Sindhudurg News, 26 June : लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेताना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दिलेला नारा वादग्रस्त ठरला आहे.

त्यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय पॅलेस्टाईन' अशी घोषणा दिली होती. त्यांच्या याच घोषणेवरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तर ओवैसी यांची जीभ कोणी छाटणार असेल तर त्याने माझ्याकडे येऊन पारितोषिक घेऊन जावं, असं जाहीर आवाहन भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माध्यमांशी संवाद साधताना, ओवैसी यांची जीभ छाटणाऱ्याला आपण पारितोषिक देणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच सामनाच्या संपादकीयवरुन त्यांनी संजय राऊतांनावरही हल्लाबोल केला.

नितेश राणे म्हणाले, पदवीधर निवडणुकीत आमचाच उमेदवार निवडून येईल. संजय राजाराम राऊत हे आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पगारावर आहेत. आणीबाणी कुणी लावली? हुकूमशहा कोण? हे संजय राऊतांनी सांगावे. महायुतीमध्ये सर्वकाही सुरळीत सुरु आहे. काळजी करण्याचं कारण नाही.

आमचे सर्व नेते रात्री एकत्र बसतात यातूनच आमच्यात संवाद आहे हे दिसून येतं. शिवाय कोकण पदवीधरसाठी मनसेचा पाठिंबा महायुतीला आहे, असं राणे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी 'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जर कोणी जीभ छाटणार असेल तर त्याने माझ्याकडे येऊन पारितोषिक घेऊन जावं, असं जाहीर आवाहन केलं.

असदुद्दीन ओवैसी संसदेत नेमकं काय म्हणाले?

AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी (ता. 25 जून) रोजी लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्वात जय भीम म्हटलं. त्यानंतर जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईनचा नारा दिला. जय पॅलेस्टाईनची घोषणा आता वादात सापडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT