NCP Politics; Ajit Pawar And MLA Shekhar Nikam sarkarnama
कोकण

NCP Politics : राष्ट्रवादीचा ‘स्वबळ’ नारा! कोकणात अजितदादांच्या आमदारानं बदलली रणनीती, मोर्चेबांधणीही सुरू

MLA Shekhar Nikam gears up for upcoming local body elections : नुकताच झालेल्या चिपळूण पालिका निवडणूकीतील शिंदेंची शिवसेना आणि भाजपने हाथ मिळवणी करत अजितदादांच्या राष्ट्रवादीला बाहेर ठेवले होते.

Aslam Shanedivan

  1. चिपळूण पालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा नारा देत तयारी सुरू केली आहे.

  2. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आमदार शेखर निकम यांची मोठी कसोटी लागणार आहे.

  3. शिवसेना-भाजप युती प्रचारात आघाडीवर असताना महाविकास आघाडीतील उमेदवार निवडीवर संभ्रम कायम आहे.

Ratnagiri/Chiplun Politics : नागेश पाटील

चिपळूण पालिका निवडणूकीतील पराभवाचे शल्य पचवून स्वबळाचा नारा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिलेदार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत मुसंडी मारण्यासाठी कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या असलेल्या या निवडणूकीत प्रामुख्याने आमदार शेखर निकम यांचा कस लागणार आहे. शिवसेना भाजप युतीने निश्चीत केलेले उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. तर महाविकास आघाडीचे अद्याप तळ्यात मळ्यात राहिले आहे. आघाडीतील प्रबळ दावेदार आप-आपल्या गण आणि गटात निवडणूकीची मोर्चेबांधणी करू लागले आहेत.

चिपळूण पंचायत समितीच्या १८ जागा आणि जिल्हा परिषदेच्या ९ गटासाठी तालुक्यात निवडणूका होत आहे. यासाठीची आचारसंहिता १३ रोजी लागू झाली असली तरी राजकीय पक्षांचे इच्छूक उमेदवार गेल्या दोन तिन महिन्यापासून निवडणूक तयारीत गुंतले आहेत. गतवेळच्या पंचायत समिती निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी ९ जागा मिळाल्या होत्या.

या निवडणूकीत शिवसेना व भाजपने युती केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत उमेदवार निश्चीत करून स्वबळाचा नारा दिला आहे. तर महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढण्याच्या भूमिकेत असल्याचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी काही दिवसापूर्वीच जाहिर केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे समोर आले आहे. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही.

मात्र आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत देखील नगरपालिकेप्रमाणेच फसगत होऊ नये यासाठी आमदार शेखर निकम जोमाने कामाला लागले आहेत. जास्त उमेदवार विजयी होण्यासाठी ते स्वतःहून लक्ष घालून आहेत. पंचायत समिती निवडणूकीत काँग्रेस आणि भाजपला गेल्या २० वर्षात यश मिळालेले नाही. मात्र भाजप नेते प्रशांत यादव यांनी पालिका निवडणुकीत कमळ फुलवल्याने पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. युतीचे बहुतांशी गण आणि गटात उमेदवार निश्चीत झाले असून ते कामालाही लागले आहेत.

तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटात ७ जागा या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. केवळ दोन प्रभाग सर्वसाधारण राहिले आहेत. त्यामुळे कोकरे आणि उमरोली गटात मोठी चुरस पहायला मिळणार आहे. पंचायत समितीच्या १८ गणांत ही निवडणूक होणार आहे. तालुक्यातील कुटरे, गुढे हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, अलोरे व मांडकी नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर भोम, कोकरे, निवळी, कळवंडे, चिंचघरी, पिंपळी, शिरगांव, दळवटणे गण सर्व साधारण महिलांसाठी राखीव आहे. तसेच पेढे, खेर्डी, वेहेळे, सावर्डे, उमरोली, वहाळ गण सर्वसाधारण प्रवर्गात आहे.

FAQs :

1. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा नारा का दिला आहे?
पालिका निवडणुकीतील पराभवानंतर संघटना मजबूत करण्यासाठी स्वबळावर लढण्याचा विचार सुरू आहे.

2. या निवडणुकांमध्ये कोणाची प्रमुख भूमिका असेल?
आमदार शेखर निकम यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

3. कोणत्या निवडणुकांची तयारी सुरू आहे?
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची.

4. शिवसेना-भाजप युतीची स्थिती काय आहे?
युतीने उमेदवार निश्चित करून प्रचार सुरू केला आहे.

5. महाविकास आघाडीची भूमिका काय आहे?
आघाडीतील पक्ष अजूनही उमेदवार निवडीवर एकमत साधू शकलेले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT