Maharashtra Politics; NCP sunetra pawar, sunil tatkare and praful patel sarkarnama
कोकण

Maharashtra Politics : धक्कादायक! विधान परिषदेसाठी तटकरेंनीच फिल्डींग लावली, पण राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा नकार; 'मी स्पर्धेत...'

MLC Election 2026 : राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी निवडणुकीची घोषणा होणार असून सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. 12 मे रोजी मतदान होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Aslam Shanedivan

  1. अनिकेत तटकरे यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीबाबतच्या सर्व चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट केले.

  2. त्यांनी उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याचे सांगत अफवांना पूर्णविराम दिला.

  3. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Raigad News : राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसह १ जागेसाठी पोटनिवडणूकीची घोषणा झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपच्या वाट्याला सर्वाधिक ६ जागा येणार असून शिंदेंच्या शिवसेनेला २ राष्ट्रवादीला १ आणि १ जागा महाविकास आघाडीला जातील. १२ मे रोजी मतदान होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

राष्ट्रवादीच्या १ जागेसाठी जोरदार रस्सीखेंच पहायला मिळत असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या मुलासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. पण आता माजी आमदार अनिकेत तटकरे यांनीच समोर येऊन याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी आपण विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छूक नाही, असे स्पष्ट केले आहे. तर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

एकीकडे भाजपच्या वाट्याला येणाऱ्या सर्वाधिक पाच आणि पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील अनेक दिग्गज तिकीटासाठी देव पाण्यात ठेवून आहेत. तर भाजपकडून राज्यसभेप्रमाणे धक्कातंत्राचा अवलंब केला जाईल अशी चर्चा रंगली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडूनही २ जागांपैकी एका जागेवर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे नाव निश्चत मानले जात आहे. तर दुसऱ्या जागेसाठी 7 दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आहेत. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला गेलेल्या १ जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे.

दरम्यान आता राष्ट्रवादीच्या एका जागेवरून देखील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून उमेदवारीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे. अशातच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या मुलासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा समोर आली होती. तर यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना शब्द टाकल्याचे बोलले जात होते.

पण आता यासर्व पार्श्वभूमीवर अनिकेत तटकरे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी, विधान परिषदेची उमेदवारी मला मिळावी म्हणून प्रदेशाध्यक्ष तटकरे प्रयत्न करत आहे, अशा बातम्या समोर येत आहेत. ज्या निराधार आणि तथ्यहीन आहेत. मी विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छूक नाही. तर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच मी या स्पर्धेत नसून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षातील इतर जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता म्हणून पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचेही अनिकेत तटकरे यांनी म्हटले आहे.

गेल्या वेळी अनिकेत तटकरे हे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्यांचा सहा वर्षाचा कार्यकाळ संपला. मात्र यानंतर कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूकच झाली नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एका जगेवर अनिकेत तटकरे यांना संधी द्यावी अशी मागणी पुढे आली. यानंतरच अनिकेत तटकरे यांचे नाव प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच पुढे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

FAQs :

1. अनिकेत तटकरे यांच्याबाबत कोणती अफवा पसरली होती?
त्यांना विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी पुढे केले जात असल्याची चर्चा होती.

2. त्यांनी या अफवांवर काय प्रतिक्रिया दिली?
या सर्व बातम्या निराधार आणि तथ्यहीन असल्याचे त्यांनी सांगितले.

3. सुनील तटकरे यांचा या प्रकरणात काय उल्लेख होता?
ते उमेदवारीसाठी प्रयत्न करत असल्याच्या बातम्या पसरवल्या गेल्या होत्या.

4. अनिकेत तटकरे उमेदवारी इच्छुक आहेत का?
नाही, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ते इच्छुक नाहीत.

5. पुढे ते काय करणार आहेत?
ते पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT