Raigadh Crime news
Raigadh Crime news 
कोकण

तीस हजाराची लाच घेताना सहाय्यक जिल्‍हा निबंधकाला अटक

सरकारनामा ब्युरो

latest crime news in Raigadh

रायगड :  नवी मुंबई (Mumbai) येथील एमआयडीसीतील जागेच्‍या कामासंदर्भात फाईलचे एज्‍युडीकेशन करण्‍यासाठी पाच लाखांची लाच मागणाऱ्या रायगडच्या (Raigadh) सहाय्यक जिल्‍हा निबंधक अथवा मुद्रांक जिल्‍हाधिकाऱ्याला मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक अटक केली आहे. शैलेंद्र साटम असे या मुद्रांक जिल्‍हाधिकाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदार यांचा कन्सस्लटिंगचा व्यवसाय आहे. ते एमआयडीसी मधील प्लॉटचे डॉक्यूमेंट एज्युडीकेशन संबंधीचे काम त्यांना प्राप्त अधिकार पत्रांद्वारे करत असतात. तक्रारदाराकडे एज्युडीकेशन कामासाठी आलेल्या तीन फाईल्स त्यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केल्या होत्या. त्या तीन फाईलचे एज्युडीकेशन करण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी देवेंद्र साटम यांनी त्यांच्याकडे लाचेची मागणी केली.

या प्रकरणी त्यांनी नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्‍यानुसार सोमवारी रात्री साटम यांच्या कार्यालयात सापळा रचून त्‍सामट याला लाच स्‍वीकारताना रंगेहात पकडण्‍यात आले. साममने 5 लाख 30 हजारांची लाच मागितली होती. त्या पैकी 30 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्‍वीकारताना शैलेंद्र साटम याला नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले आहे. 

शैलेंद्र साटम 30 हजारांची लाच घेताना पकडले असले तरी त्याच्या कार्यालयीन टेबलाच्या झाडाझडतीमध्ये 5 लाख 63 हजार रुपयांचे घबाडही या कारवाईत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला सापडले आहे सोमवारी रात्री झालेल्‍या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे  उपअधीक्षक शिवराज बेंद्रे  यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT