चिपळून : राजकारणात नेते अत्यंत कठोरपणे एकमेकांवर टीकास्त्र सोडत असतात. अनेकदा या टीका-टिपण्णी वैयक्तिक वैमनस्य निर्माण होते. नेत्यांच्या समर्थनात कार्यकर्तेही उतरतात. मात्र ही लढाई फक्त राजकीय टिका-टिपण्णी पुरती मर्यादित राहिली तर ठिक, पण ती कधी कधी हिंसेवर उतरते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. दोन नेत्यामधला, दोन पक्षांमधला वाद आता घरावर हल्ला करण्यापर्यंत आले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
जाधव यांच्या चिपळूण येथील त्यांच्या राहत्या घरावर काही अज्ञात हल्लेखोरांकडून मध्यरात्री दगडफेक करण्यात आली. काहीजणांनी मध्यरात्री जाधव यांच्या निवासस्थानावर दगडांनी हल्ला केला. क्रिकेटचे स्टंम्प फेकले गेले, बाटल्या फेकण्यात आले, यानंतर हे अज्ञात हल्लेखोर पळून गेले. यामुळे कोकणाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. हे हल्लेखोर कोण आहेत, त्यांची ओळख होऊ शकली नाही. मात्र या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर स्थनिक पोलिस जाधव यांच्या घरी दाखल झाले. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या हल्ल्यानंतर जाधव यांच्या घराभोवती पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आले आहे. तसेच घराशेजारील व सबंधित मार्गावरील सीसीटीव्ही कॅमरांची तपासणी केली जात आहे. तसेच शेजाऱ्यांची चौकशी करून, त्याच्यांशी बातचीत करून, या संबंधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
दरम्यान, भास्कर जाधव यांनी केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांवर कठोर शब्दात टिका केली होती. या हल्ल्याचा याच्याशी काही संबंध आहे का? राजकीय वैमन्यस्यातून हा हल्ला झाला का ? असा संशय व्यक्त केला जात आहे.
या सर्व घडामोडींवर स्वत: भास्कर जाधव यांच्याकडून कसलीही प्रतिक्रिया अजूनही आलेली नाही. मात्र, या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ माजलेली आहे. जाधव हे मोठे राजकीय नेते आहेत. जिल्ह्यात त्यांचे मोठे प्रस्थ आहे. त्यांच्या घरावर असा हल्ला करण्यात आल्याने परिसरात चर्चा सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.