Bala Nandgaonkar, Udhav Thackeray
Bala Nandgaonkar, Udhav Thackeray sarkarnama
कोकण

मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेनेला बाळा नांदगावकरांचा टोला...

सरकारनामा ब्युरो

डोंबिवली : इतके वर्षे मराठी मराठी करून मत घेतली. सत्ता आपल्या हातात आहे, राज्य आपल्या हातात आहे. एवढे सगळे ताब्यात असताना मराठीची गळचेपी का झाली, असा प्रश्न उपस्थित करून मराठी भाषेला सन्मान मिळत नाही. अभिजात भाषेचा सन्मान मिळत नाही, असा सवाल मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.

डोंबिवलीत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पुन्हा एकदा मराठी विषयाला हात घालत सत्ताधारी शिवसेनेला नाव न घेता टोला हाणला आहे. मनसे नेते अमित राज ठाकरे आज आणि उद्या कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी दादर ते डोंबिवली लोकल प्रवास केला. रस्त्यांवर खड्डे, ट्रॅफिकमुळे त्यांनी लोकलमधून प्रवास केला. तसेच अमित ठाकरे पुणे, नाशिक नंतर आता कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर आल्याने मनसेची निवडणुकीची तयारी सुरू झाली अशी चर्चा रंगू लागली आहे.

कल्याण-डोंबिवलीत विविध ठिकाणी पदाधिकारी यांच्या बैठका घेतल्या जात आहे. याबाबत मनसे नेते शिरीष सावंत यांनी सांगितले की, शाखा अध्यक्षांची आत्तापर्यंत ची वाटचाल, काही त्रुटी आहेत का आणि त्याला पुढे कसे जात येईल, शेवटच्या मतदारपर्यंत त्याला कसे पोहोचता येईल, त्या दृष्टीने बांधणी करत आहोत. दुसरीकडे मुंबईमधील भाजपाचे आमदार अमित साठम यांनी मराठी शाळा आणि मराठी भाषेचा विषय उचलला मराठी शाळेच्या संख्येबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत चिंता व्यक्त केली.

त्यानंतर डोंबिवलीत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सुद्धा मराठीचा पुन्हा एकदा मराठी विषयाला हात घालत सत्ताधारी शिवसेनेला नाव न घेता टोला हाणला आहे. नांदगावकर यांनी सांगितले की, इतके वर्षे मराठी मराठी करून मत घेतली. सत्ता आपल्या हातात आहे, राज्य आपल्या हातात आहे. एवढे सगळे ताब्यात असताना मराठीची गळचेपी का झाली. मराठी भाषेला सन्मान मिळत नाही, का. अभिजात भाषेचा सन्मान मिळत नाही, असा सवाल बाळा नांदगावकर यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT