Bharat Gogawale Sarkarnama
कोकण

Bharat Gogawale : मी मंत्री का होत नाही ? भरतशेठ आता देवालाच विचारणार..

Maharashtra Politics : "वेगळं काही हवं म्हणून भरतशेठला मंत्रिपद नको,"

Mangesh Mahale

Raigad News: मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येऊ लागल्या की शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे नाव आघाडीवर असते. मंत्री होण्यासाठी त्यांनी यापूर्वी पंढरपुरात विठुरायाला, महादेवाला साकडे घातले होते. पण त्यांची इच्छा पूर्ण झालेली नाही.

भरतशेठ यांनी आता त्यासाठी नवा फंडा शोधून काढला आहे. त्यांनीच खुद्द याबाबत स्पष्टीकरण दिले. "शपथविधीसाठी कपडे तयार ठेवले आहेत, आम्ही फक्त आता शपथविधी सोहळ्याची वाट बघतोय, अशा शब्दांत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही दिवसापूर्वी भाष्य केले होते.

देवाला काही मानपान द्यावं लागेल?

मंत्रिपद मिळण्यासाठी काय अडचणी येत आहेत, याबाबत भरतशेठ आता देवाला कौल लावणार आहेत. मंत्री होण्यासाठी काय अडचण आहे, मंत्री होणार की नाही हे कौल लावून भरतशेठ थेट देवालाच विचारणार आहेत.

"देवाला काही मानपान द्यावं लागेल का ते पाहावे लागेल," असे गोगावले म्हणाले. रायगडमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. "भरतशेठ मंत्री नाही, म्हणून काम करण्यासाठी थांबत नाही. जनता माझ्याकडे यायची थांबलेली नाही. कामे घेऊन जनता येत आहे. त्यांची कामे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचवतो. त्यांना मदत करतो. त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करतो," असे गोगावले म्हणाले.

'... म्हणून भरतशेठला मंत्रिपद नको'

"मंत्री होण्याची इच्छा का नसावी, मी तीनवेळा आमदार झालो आहे, रायगडमध्ये शिवसेनेचा मंत्री नाही, म्हणून कार्यकर्त्यांची ही मागणी आहे. बाकी काही नाही, वेगळ काही हवं म्हणून भरतशेठला मंत्रिपद नको," असे त्यांनी स्पष्ट केले.

.. ती वेळ आता आली आहे..

मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून गोगावलेंची ओळख आहे. तरीही त्यांना मंत्रिपद मिळाले नाही, या प्रश्नावर ते म्हणाले, "मी माझे काम करीत असतो. मी मंत्री व्हावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना वाटले तर ते नक्की मला मंत्री करतील. ती वेळ आता आली आहे," असे भरतशेठ यांनी ठासून सांगितले. हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यानंतर भरतशेठ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार का? हे लवकरत समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT