Bhiwandi Municipal Corporation : भिवंडी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेविका फरजाना मोहम्मद सुलेमान अन्सारी यांचे ‘अन्सारी’ जातीचे ओबीसी प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे.
त्यामुळे त्यांच्या नगरसेवकपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फरजाना अन्सारी यांनी वॉर्ड क्रमांक 4 (अ) मधून ओबीसी (OBC) महिला प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर समाजवादी पक्षाच्या पराभूत उमेदवार इरम अहमद हुसैन अन्सारी यांनी आक्षेप घेतला होता. या आक्षेपाची समितीसमोर सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान फरजाना अन्सारी यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ‘मुस्लिम’ (Muslim), तर त्यांच्या वडिलांच्या दाखल्यावर ‘इस्लाम सुन्नी’ अशी नोंद असल्याचे समितीसमोर मांडण्यात आले. तसेच भाऊ-बहिणींच्या दाखल्यांवर ‘इस्लाम जुलाह’ अशी नोंद असल्याचेही सांगण्यात आले.
या प्रकरणात दक्षता पथकाचा अहवाल तसेच सादर करण्यात आलेल्या विविध कागदपत्रांची समितीने तपासणी केली. त्यानंतर अध्यक्षा रेवती गायकर यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने फरजाना अन्सारी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय घेतला.
जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने फरजाना अन्सारी यांच्या नगरसेवकपदाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. ओबीसी महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेविकेचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे आता त्यांच्या पदाबाबत पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया काय होते, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.