Dapoli Sai Resort Sarkarnama
कोकण

Dapoli Sai Resort: साई रिसॉर्ट प्रकरणात मोठी अपडेट; सदानंद कदम, देशपांडेंच्या जामीन अर्जावर होणार फैसला

Sai Resort Scam : दापोलीतील साई रिसोर्ट प्रकरण गेल्या दोन वर्षापासून चांगलेच चर्चेत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News : दापोलीतील साई रिसोर्ट प्रकरण गेल्या दोन वर्षापासून चांगलेच चर्चेत आहे. साई रिसोर्ट प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) अनेकवेळा आमने-सामनेही आले. या प्रकरणावरून किरीट सोमय्यांनी हातोडा यात्राही काढली होती. आता याच प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली असून तुंरूगात असलेले सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्या जामीन अर्जावरील निकाल १ ऑगस्टला येण्याची शक्यता आहे.

साई रिसोर्ट प्रकरणामध्ये सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांना मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून या प्रकरणासंदर्भातील जामीन अर्जावरील सुनावणी १० जुलैला आटोपली होती. मात्र, निकालाचे वाचन अद्याप बाकी असल्याने निकाल पुढे ढकलण्यात आला होता.

सदानंद कदम हे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत, तर जयराम देशपांडे हे तत्कालीन प्रांताधिकारी आहेत. या साई रिसोर्टच्या बांधकामात 'सीआरझेड' कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची ईडी देखील चौकशी करत असून १९ जुलैला या रिसॉर्टवर ईडीने जप्तीची कारवाई केलेली आहे.

या रिसोर्टच्या प्रकरणामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय असून रिसॉर्टच्या बांधकामासाठी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून अवैध परवानगी मिळवल्याचाही आरोप आहे. त्यामुळे या सर्व प्रकणाची चौकशी सुरू असून काही दिवसांपूर्वीच न्यायालयात या प्रकरणासंदर्भात आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र, या आरोपपत्रात अनिल परबांचे नाव नसल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला होता.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT