Uddhav Thackeray , Nitesh Rane  Sarkarnama
कोकण

Barasu Refinery News : उद्धव ठाकरे म्हणजे कोकणाला लागलेला शाप ; बारसुमध्ये नितेश राणेंचा हल्लाबोल

Nitesh Rane ON uddhav thackeray : राणे यांनी आज रिफायनरी समर्थंकासह परिसरात मोर्चा काढला होता.

सरकारनामा ब्यूरो

Nitesh Rane criticized thackeray group leader uddhav thackeray : कोकणातील प्रस्तावित रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू सोलगाव येथे हजारो स्थानिकांचे काही दिवसापूर्वी आंदोलन झाले. या परिसरात सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे. (BJP mla Nitesh Rane Criticized Uddhav thackeray over Barasu Refinery)

येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू ग्रामस्थांची भेट घेतली. बारसू प्रकल्पावरुन रिफायनरी समर्थक आणि विरोधक यांच्यात वाद सुरु आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज बारसू ग्रामस्थांशी संवाद साधताना शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यकर्त्याना या रिफानरीचे समर्थन करून दाखवण्याचे आव्हान दिले. त्याला भाजप नेते, नितेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. रिफायनरीच्या समर्थनासाठी नितेश राणे,

भाजप नेते, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांनी आज रिफायनरी समर्थंकासह परिसरात मोर्चा काढला होता. यावेळी राणे बंधुनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारसूमध्ये रिफायनरी झाली पाहिजे असे समर्थनार्थ पत्र काढलं. त्यानंतर आता विरोधी पक्षात असताना या ग्रीन रिफायनरीला विरोध करण्याचे सुचतयं हा विचार नेमका कसा बदलला?" असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.

‘कोणीतरी एक पर्यटक मुंबईवरून आलेला आहे. उद्धव ठाकरे म्हणजे कोकणाला लागलेला शाप आहेत’, अशा शब्दांत नितेश राणेंनी ठाकरेंची खिल्ली उडवली. ते म्हणाले, "बारसू गावामध्ये त्यांचे हेलिकॉप्टर उभे करू दिले नाही. त्यामुळे जैतापूरमध्ये कुठेतरी उभे केले आहे. बारसू गावामध्ये जाऊन काही लोकांशी बोलून पेटवापेटवीचे काम करून ते परत मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. त्यांनी जे भाषण केलं. त्याची मला माहिती मिळाली. मी तर महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची ओळख कोणी द्यायची झाली तर, महाराष्ट्राचा सर्वात मोठा दलाल कोण असेल, तर आज तुमच्या रत्नागिरीतील बारसूमध्ये आलेला आहे”,

"उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना जे पत्र पंतप्रधानांना दिले त्याची किंमत 100 कोटी रुपये होती. ते 100 खोके स्वत:च्या मातोश्रीवर पोहोचले पाहिजे यासाठी पत्र व्यवहार केला होता. आज उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने कोकणात आले. पण उद्धव ठाकरे आणि त्यांचा कुटुंबियांचा नेमका व्यवसाय काय आहे ? कुठला धंदा, व्यवसाय ते करीत आहेत? असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे. निलेश राणेंनीही जहरी शब्दात ठाकरेंवर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT