Ganesh Naik Vs Shinde Shiv Sena  Sarkarnama
कोकण

Ganesh Naik Vs Shinde Shiv Sena : 'स्मृतिभंग झालेला स्वयंघोषित शिल्पकार'; शिंदे सेनेनं भाजप मंत्री नाईकांना होम ग्राऊंडवर डिवचलं

Ganesh Naik Targeted by Eknath Shinde Sena Leader Ankush Kadam in Navi Mumbai Banner Row : भाजप मंत्री गणेश नाईक यांना एकनाथ शिंदे शिवसेनेने नवी मुंबईत बॅनरबाजी करून डिवचल्याने राजकारण तापलं आहे.

Pradeep Pendhare

Navi Mumbai political news : भाजप मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय द्वंद जोरात पेटलं आहे. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना ओपन चॅलेंज देत, डिवचलं आहे. नाईक-शिंदे यांच्या राजकीय लढाईत, संजय राऊत यांनी नाईकांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे.

यातच एकनाथ शिंदे शिवसेनेने मंत्री नाईक यांना त्यांच्या होम ग्राऊंडवर फलकबाजी करून चांगलच डिवचलं आहे. ही फलकबाजीवरील मजकूर, चर्चेचा विषय ठरली आहे. पुढचा राजकीय अनर्थ टाळण्यासाठी, नवी मुंबई महापालिकेने हे बॅनर तत्काळ हटवले आहेत.

नवी मुंबई शहरामध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेचे संपर्कप्रमुख अंकुश कदम यांनी भाजप (BJP) मंत्री गणेश नाईक यांच्याविरोधात सूचक अशी, परंतु त्यांचा नाव टाळून जोरदार फलकबाजी केली आहे. या फलकांवरील मजकूर चर्चेचा विषय ठरला आहे.

मंत्री गणेश नाईक यांनी चॅलेंज देऊन, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नावासमोर कायमचं माजी खासदार करेल, असे म्हटलं होते. खासदार शिंदे यांनी देखील, प्रत्युत्तर देत मंत्री नाईक यांना आव्हान दिलं होतं. हाच धागा पकडून, शिंदे सेनेच्या नवी मुंबईमधील संपर्कप्रमुख अंकुश कदम यांनी मंत्री नाईक यांना डिवचणारी फलकबाजी केली.

हॅशटॅग ओपन चॅलेंज, स्मृतिभ्रंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकारांचा मोफत उपचार करून मिळेल! असे लिहित मजकुराखाली डाॅक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, पुढे एमबीबीएस, एमएस ऑर्थो, अशी डिग्री देखील लिहिली आहे. संपर्कसाठी संर्पकप्रमुख शिवसेना-अंकुश बाबा कदम, असे फलकबाजीवरील मजकुराखाली लिहिले आहे.

नवी मुंबईत, एकनाथ शिंदे शिवसेनेकडून अशी फलकबाजी होताच, मंत्री नाईक समर्थक आक्रमक झाले आहेत. नवी मुंबई महापालिका प्रशासनाला या फलकबाजीकडे लक्ष वेधत अधिकृत परवानगी घेऊन फलक लावण्यात आली आहेत का? याची विचारणा केली. यावर फलक लावताना शिंदे सेना पदाधिकाऱ्यांनी परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाला, मंत्री नाईक समर्थकांनी ही फलकबाजी लक्षात आणून दिल्यावर प्रशासनाची एकच धावपळ उडाली. नवी मुंबई महापालिका नवी मुंबई शहरातले अनधिकृतपणे लावलेले शिंदे सेना पदाधिकाऱ्यांचे हे फलक हटवण्याची कारवाई केली.

दरम्यान, भाजप अन् एकनाथ शिंदे शिवसेना हे दोघे मित्रपक्ष आहे. तसेच ते सत्तेत आहेत. चार दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे मुंबईतील नेते अखिल चित्रे यांनी उपहासात्मक फलक लावण्यावरून, 'महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्यान्वये' थेट गुन्हा दाखल केला होता.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे संपर्कप्रमुख अंकुश कदम यांनी केलेल्या फलकबाजीविरोधात नवी मुंबई महापालिका प्रशासन गुन्हा दाखल करणार का? अशी चर्चा आहे. दरम्यान, नवी मुंबई महापालिका प्रशासनाने, असा गुन्हा नोंदवण्याची हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT