Aaditya Thackeray, Nilesh Rane  Sarkarnama
कोकण

Nilesh Rane slams Aaditya Thackeray : निलेश राणेंचा ठाकरेंवर घणाघात ; आदित्य ठाकरेंच्या शाळेची फी BMC च्या..

Maharashtra Politics : आधी एखादी तरी नोकरी..

सरकारनामा ब्युरो़

Mumbai News : ठाकरे आणि राणे वाद जगजाहीर आहे. भाजपचे नेते निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते, माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आज (रविवारी) घणाघाती टीका केली आहे. निलेश राणे यांनी टि्वट करीत ठाकरेंवर हल्लाबोल केला.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातील शाब्दीक युद्ध रंगण्याचे चित्र आहे. "आधी एखादी तरी नोकरी कर मग भ्रष्टाचाराचे आरोप कर," असे टि्वट निलेश राणे यांनी केलं आहे.

रस्ते काँक्रिटीकरण घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा किंवा खडी घोटाळा याबाबतच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला आहे.मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात ठाकरे गटाने शनिवारी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आदित्य ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपवर भष्ट्राचाराचे आरोप करीत जहरी टीका केली होती.

आदित्य ठाकरेंच्या टीकेला निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या टि्वट मध्ये राणे म्हणतात, "BMC नसती तर उद्धव ठाकरे कुटुंब चड्डी बनियान पण विकत घेऊ शकले नसते, आदित्य ठाकरे आधी स्वतः एकतरी नोकरी धंदा कर आणि मग भ्रष्टाचाराचे आरोप कर. आदित्य ठाकरेंची शाळेची फी पण BMC च्या पैशाने भरली गेली,"

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे..

मुंबईत कधीही एवढं घाणेरडं आणि भयानक वातावरण बघितलं नव्हतं. या राजकारणात फोडाफोडी सुरू आहे. एक ते दोन आयपीएस ऑफिसरांना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑफर दिली आहे. त्यांचं रेकार्डिंग देखील आमच्या हातात आलं आहे. जेव्हा आम्हाला दाखवायचं असेल तेव्हा आम्ही दाखवून देऊ. परंतु हे तीन घोटाळे आज मी तुमच्यासमोर मांडत आहे. त्यामुळे तुम्ही ठरवा की, मी योग्य की अयोग्य बोलतोय. ५० खोके हा घोटाळा असून मूळात सरकारच घोटाळा आहे. पहिला सर्वात मोठा आणि भयानक घोटाळा म्हणजे रस्त्यांचा घोटाळा होता. कारण हा घोटाळा तुमच्या आमच्या पैशांतून झाला आहे. तुम्ही जी काही चोरी केली आहे. ती आमच्या नजरेत आली आहे. तुमच्या फाईल्स देखील आम्ही बनवल्या आहेत. जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही आणि पोलीस आत येऊन तुम्हाला तुमची जागा दाखवणार.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT