सिंधुदुर्ग : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात राणेंच्या जामिनावर आज फैसला झाला. अखेर न्यायालयाने राणेंचा जामीन फेटाळला आहे. ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) हे त्यांच्या बाजूने मैदानात उतरले होते. राणेंची अटक अत्यावश्यक असल्याची भूमिका सरकारी पक्षाने घेतली घेतली होती.
आमदार नितेश राणे हे सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयासमोर काल हजर झाले आहेत. त्यांच्यासोबत बंधू माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) आणि वकील सतीश मानेशिंदे पोचले. न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बाजू मांडली होती. न्यायालयाने अखेर राणेेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना अटक होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी सत्र न्यायालयासमोर हजर झाला म्हणजे तो न्यायालयाच्या ताब्यात आला. पुढील कार्यवाही आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर होईल. त्यामुळे आरोपीला ताब्यात घ्यावे, अशी आमची मागणी होती. न्यायालयाने यावर उद्याच निर्णय देण्याचे जाहीर केले आहे. नितेश राणे गायब होते, हा दावा त्यांचे वकील खोडून काढू शकले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेपर्यंत राणे समोर आले नव्हते. अन्यथा पोलीस त्यांना अटक करु शकत होते. तपासासाठी नितेश राणेंची अटक अत्यावश्यक आहे, अशी बाजू सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मांडली होती.
नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 24 तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. नितेश राणे वकिलांसमवेत न्यायालयात हजर झाले होते. त्यांनी शरण येण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. (Nitesh Rane News)
मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले होते. (Nitesh Rane bail hearing)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.