Narayan Rane On Uday Samant And Vaibhav Naik sarkarnama
कोकण

Narayan Rane : उदय सामंतांचा डाव राणेंनी दोनच शब्दात उधळला, म्हणाले, 'त्याचं ऐकायला तो काही आमच्या घराचा...'

Narayan Rane On Uday Samant And Vaibhav Naik : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांना शिवसेना प्रवेशाची ऑफर दिली होती.

Aslam Shanedivan

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बिडवलकर हत्याप्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक विरुद्ध राणे कुटुंबीय असा सामना रंगला आहे. वैभव नाईक विरुद्ध राणे कुटुंबीय यांच्यातील राजकीय वैर जूने असून आता फक्त बिडवलकर हत्या प्रकरणाने यात फोडणीचे काम केलं आहे. यावरून सध्या वैभव नाईक आणि शिवसेना आमदार नीलेश राणे एकमेंकावर आरोप करताना दिसत आहेत.

दरम्यान वैभव नाईक आणि नीलेश राणे यांच्यातील वाद मिठवण्यासाठी दोन पावले टाकण्याचे काम मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. त्यांनी यामागून आपला राजकीय डाव खेळताना नाईक यांना थेट शिवसेना पक्षप्रवेशाचेच आमंत्रण दिले. फक्त आमंत्रणच दिले नाही तर आमदार नीलेश राणेच त्यांचं स्वागत करतील असे वक्तव्य केलं होतं. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

वैभव नाईक यांनी आता शिवसेनेत यावं, आमदार निलेश राणेही त्यांचे पक्षात स्वागत करतील, मी त्यांना शिवसेनेत येण्याचे निमंत्रण देतो, असे विधान मंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुडाळ दौऱ्यापूर्वी पत्रकार परिषदेतून केले होते.

याबाबत आज (ता.27) नारायण राणे यांनी थेट टोलेबाजी करताना उदय सामंतांचा राजकीय डाव उधळून लावला आहे. राणे यांनी मंत्री उदय सामंत यांना टोला लगावताना, उदय सामंत हा आमचा अ‍ॅडव्हायझर नाही. ना आमच्या घरचा कर्ता त्यामुळे त्याच ऐकायला काय???, अशा शब्दात फटकारले आहे. याचबरोबर वैभव नाईक यांच्या शिवसेनेतील प्रवेशावरून त्यांनी मला विचारल्याशिवाय वैभव नाईक यांना कोणीही पक्षात घेणार नाहीत असाही दावा केला आहे. यामुळे आता वैभव नाईक यांना राणेंचा विरोध कायम असल्याचे दिसून येत आहे.

काय म्हणाले होते उदय सामंत?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात फक्त तीनच नेते शिल्लक राहिले आहेत. पण सत्ता आमच्या शिवसेनेकडे आहे. आता जिल्ह्याचा विकास सूसाट होईल. यामुळे माजी आमदार वैभव नाईक यांनी देखील जिल्ह्याच्या विकासासाठी आमच्याबरोब यावं. त्यांनी शिवसेनेत यावं. ते शिवसेना पक्षात आले तर आमदार नीलेश राणे हे ही त्यांचे पक्षात स्वागत करतील, असे त्यांनी म्हटलं होतं.

सामंत यांनी थेट राणेंच्या राजकीय शत्रूलाच शिवसेनेची ऑफर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण त्यांच्याही पुढे जाऊन त्यांनी नीलेश राणे हेही वैभव नाईक यांचे स्वागत करतील अशा दाव्याने आता वाद वाढवला आहे. या वक्तव्यामुळे राणे-वैभव नाईक यांच्यातील फाटलेल्या राजकीय वादावाचा फायदा सामंत यांना होणार असल्याचीही चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT