जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे उद्या सिंधुदुर्गात येणार आहेत.
बांदा ते कणकवली दरम्यान ठिकठिकाणी राणेंचं भव्य स्वागत आणि समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे उपस्थित राहणार असून राणेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Sindhudurg BJP politics : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. या निवडणुकीत पालकमंत्री नितेश राणेंसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठे धक्के बसले. पण मालवणमध्ये निलेश राणेंनी सत्ता राखली. यावेळी कणकवली, मालवणमध्ये भाजपचा पराभव झाला. या झालेल्या निवडणुकीत घरातच वाद निर्माण झाल्याने खासदार नारायण राणे यांनी प्रचारातून काढता पाय घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा तळकोकणात त्यांचा आवाज घुमणार असून सध्या जिल्ह्यात त्यांचे 'एकच ना..रा' अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. ज्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच जिल्ह्यात जोरदार प्रचार सुरू होता. येथे ४ नगराध्यक्ष पदांसह ७७ नगरसेवक पदांसाठी निवडणूक लागली असतानाच महायुतीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत एकमत झाले नाही आणि राजकीय फूट पडली. ही राजकीय फूट शिवसेना आणि भाजपसह राणे बंधुंमध्ये पडल्याची पहायला मिळाली. दरम्यान त्यांच्यात जाहीर राजकीय संघर्षही पहायला मिळाला.
निलेश राणेंनी निवडणुकीच्या दरम्यान मालवणमध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला होता. तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच येथे पैसे उतरल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपनंतर नितेश राणे यांनी जोरदार पलटवार केला होता. ज्यानंतर येथील राजकीय संघर्ष वाढला होता.
याचदरम्यान निलेश राणेंसह केसरकर यांनी थेट खासदार नारायण राणे यांना प्रचारापासून रोखलं जातयं. त्यांचे राजकीय अस्तित्व संपवलं जातयं असा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे भाजपचे खासदार असणारे नाराण राणे प्रचारापासून दूर का असा सवाल जिल्ह्यात त्यावेळी सर्व मतदारांना पडला होता. तर दोन्ही राणे बंधुंमध्ये उसळलेल्या जाहीर राजकीय संघर्षामुळेच त्यांनीच प्रचारातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा होती.
पण आता त्याच माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचं वादळ तळकोकणात रविवारी (ता.४) घोंघावणार असून त्यांचे जंगी स्वागत होणार आहे. तसेच जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे समर्थकांचा होणार मेळावा होणार आहे. तर या मेळाव्यास पालकमंत्री नितेश राणेंसह आमदार निलेश राणे देखील राहणार उपस्थित राहणार आहेत.
“एल्गार रॅली” या नावाखाली बांदा ते कणकवली दरम्यान महाशक्ती रॅली निघणार असून सध्या जिल्ह्यात याच्यासह राणे समर्थकांनी लावलेले बॅनर सर्वांचे लक्ष वेधले आहे. या बॅनरवर खासदार नारायण राणेंचे 'एकच ना..रा' असा उल्लेख केला आहे.
या लावलेल्या बॅनर आणि आयोजित रॅलीतून राणे समर्थकांकडून राणेंना संपवण्याचा कथित कट रचणाऱ्या अदृश्य शक्तींना आणि विरोधकांना थेट, स्पष्ट इशारा देण्यात आला असून कोकणाच्या राजकीय वर्तुळात एकच वाघ असून राणे ब्रॅण्ड! असल्याचे सांगण्यात आले आहे.
Q1. नारायण राणे सिंधुदुर्गात कधी येणार आहेत?
➡️ उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत.
Q2. राणेंच्या दौऱ्याचा उद्देश काय आहे?
➡️ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे.
Q3. राणेंच्या स्वागत कार्यक्रमात कोण उपस्थित राहणार आहेत?
➡️ मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत.
Q4. स्वागत कार्यक्रम कुठे होणार आहे?
➡️ बांदा ते कणकवली दरम्यान विविध ठिकाणी स्वागत आणि नंतर समर्थकांचा मेळावा होणार आहे.
Q5. या मेळाव्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता का आहे?
➡️ नारायण राणे आपल्या भाषणातून पुढील राजकीय दिशा स्पष्ट करतील, अशी अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.