Ratnagiri BJP Politics sarkarnama
कोकण

BJP Politics : रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या रेसमध्ये सावंतासह चौघे; कोणाला मिळणार संधी? नावे झाली पाकिट बंद,धाकधूकही वाढवली

Ratnagiri BJP Politics : राज्यभरात भाजपने पक्षीय पातळीवर भाकरी फिरवण्याच्या निर्णय घेताना कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 1021 मंडळांपैकी 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्ती केल्या आहेत.

Aslam Shanedivan

Ratnagiri News : राज्यात निधानसभेनंतर सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे. यानंतर आगामी स्थानिककडे भाजपने लक्ष केंद्रीत केलं असून सदस्य नोंदणी कार्यक्रमासह पक्षीय पातळीवर नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यांनी 1021 मंडळांपैकी 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्ती केल्या आहेत. ज्यामध्ये रत्नागिरी उत्तरमध्ये 7 व दक्षिणमध्ये 12 मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. यानंतर आता भाजप जिल्हाध्यक्षपदाची हूरहूर अनेकांना लागली असून पाच नावांची चर्चा आहे. यामुळे भाजपचा नवा जिल्हाध्यक्ष कोण याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू झाली आहे.

भाजपच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची प्रक्रिया प्रदेश कार्यालयाकडून करण्यात आली. पर्यवेक्षक आमदार संजय केळकर, निरीक्षक माजी आमदार प्रमोद जठार आणि संघटनमंत्री शैलेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत भाजपच्या 25 जणांच्या कमिटीने प्राधान्यक्रमाने ठरवण्यात आलेली नावे बंद पाकिटात बंद केली आहेत. ती आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवली जाणार आहेत. तर पुढील 8 दिवसांत रत्नागिरीसह एकाचवेळी राज्यातील भाजपच्या 78 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर होणार आहेत.

भाजपाने जिल्हाध्यक्ष निवडण्यासाठी 25 जणांची कमिटी केली आहे. यामध्ये जिल्हाध्यक्षांसह, सरचिटणीस, माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष अशा ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना प्राधान्यक्रमाने म्हणजे 1, 2, 3 या क्रमाने जिल्हाध्यक्ष कोणाला करावे, त्यांची क्षमता काय, आदी लिहून बंद पाकिटातून द्यायचे होते.

आज 22 जणांनी आपली मते यामध्ये लिहून दिली आहेत. कमिटीमधील खासदार नारायण राणे यांच्यासह तिघांची मते लवकरच त्यात घेतली जाणार आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रदेश कार्यालयात जमा

भाजपच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी (ता.28) सायंकाळी बंद पाकिटातून मते घेण्यात आली. यामध्ये विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, प्रमोद अदटराव, अमित केनकर, मुन्ना चवडे यांच्यासह सचिन वहाळकर यांची नावे सध्या रेसमध्ये आहेत. तर या पाच जणांची नावे बंद लिफाप्यात प्रदेश कार्यालयात जमा करण्यात येतील. आमदार संजय केळकर आज (ता.29) उत्तर रत्नागिरीच्या निवड प्रक्रियेसाठी रवाना झाले असून, ही प्रक्रिया आज होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT