Raigad Crime News : रायगड जिल्ह्यामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी धडक कारवाई करत ४० लाख रुपयांच्या लाचखोरीचा प्रकार घगडकीस आणला होता. या प्रकरणात गेल्या महिन्यात कारवाई करत केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका खासगी मध्यस्थाला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून फरार असाणाऱ्या CGST अतिरिक्त आयुक्ताला CBI ने अटक केली आहे. विनय कुमार कांथेती असे अतिरिक्त आयुक्ताचे नाव असून त्याला ऋषिकेश येथून CBIने ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली महिती अशी की, गेल्या महिन्यात (ऑगस्ट) CBI ने रायगड जिल्ह्यामध्ये धडक कारवाई केली होती. तर रॉयल्टी प्रकरण निकाली काढण्यासाठी तब्बल1.50 कोटींची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला होता. तर ही डील ४० लाखांवर फिक्स झाली होती.
या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त विनय कुमार कांठेती, अधीक्षक राकेश कुमार सिन्हा आणि खासगी मध्यस्थी नरेंद्र राजपूत यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली होती. ज्यानंतर सीबीआयने २७ ऑगस्ट रोजी सापळा रचला. आणि एका खासगी व्यक्तीला ४० लाखांची लाच स्वीकारताना मध्यस्थी नरेंद्र राजपूतला ताब्यात घेण्यात आले.
मध्यस्थी नरेंद्र राजपूत याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने ही रक्कम अधीक्षक राकेश कुमार सिन्हा आणि अतिरिक्त आयुक्तांच्या सांगण्यावरून स्वीकारल्याचा जबाब दिला. ज्यानंतर अतिरिक्त आयुक्त विनय कुमार कांठेती, अधीक्षक राकेश कुमार सिन्हा आणि खासगी मध्यस्थी नरेंद्र राजपूत यांना अटक करण्यात आली होती. तर ठाणे येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले होते.
मात्र विशेष न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवत आरोपींना जामीन दिला होता. ज्यानंतर सीबीआयने विशेष न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. या याचिकेवर १६ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली आणि उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा आदेश रद्द केला. तसेच आरोपींना दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. या आदेशाने सीबीआयने अधीक्षक सिन्हा आणि मध्यस्थी नरेंद्र राजपूत यांना ताब्यात घेतले.
मात्र यावेळी अतिरिक्त आयुक्त विनय कुमार कांठेती यांनी सीबीआयला चकवा देत फरार झाले. सीबीआयने त्यांचा शोध सुरूच ठेवला होता. दरम्यान ऋषिकेश येथे अतिरिक्त आयुक्त असल्याची पक्की खबर सीबीआयला मिळाली आणि अखेर सीबीआयच्या पथकाने कांठेती यांना ताब्यात घेतले. कांथेती हे २००९ बॅचचे IRS अधिकारी आहेत.
झाडाझडतीत घबाड सापडले
दरम्यान तिघांना ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने आरोपींच्या निवासस्थान आणि इतर ठिकाणांवर छापेमारी केली होती. ज्यात सीबीआयला 43 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 90 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.