Bhaskar Jadhav, Ramesh Kadam News Sarkarnama
कोकण

Konkan Politics : जाधव-कदम यांना एकत्र येण्याचा मार्ग मोकळा; चिपळूण मतदारसंघावर वर्चस्वासाठी लक्ष

Bhaskar Jadhav News : शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर आमदार भास्कर जाधव, उद्धव ठाकरेंच्या बरोबर राहिले.

मुझफ्फर खान

Chiplun News : शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर आमदार भास्कर जाधव, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) बरोबर राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर माजी आमदार रमेश कदम पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर राहिले आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी एकत्र राहिल्यास भास्कर जाधव आणि रमेश कदम एकत्र येण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.

राज्यात भाजपाला (BJP) सत्ता स्थापन करण्यासाठी फुटलेल्या शिवसेनेने (Shiv Sena) सहकार्य केले. त्यानंतर फुटलेली राष्ट्रवादी राज्य सरकारमध्ये सामील झाली. आता स्थानिक पातळीवरचे आराखडे बांधले जात आहे. कोण कुठे एकत्र येईल आणि कोण कोणाला विरोध करेल याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. कोकणातील एकमेकांचे पारंपरिक राजकीय शत्रू असलेले भास्कर जाधव व रमेश कदम हे या राजकीय घडामोडीत एकत्र येण्याची शक्यता आहे.

आमदार शेखर निकम यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर रमेश कदम ॲक्टिव्ह झाले आहे. ते मागील पाच वर्ष पालिकेच्या सत्तेपासून लांब आहे. त्यांना पालिका पुन्हा ताब्यात हवी. बदललेल्या राजकीय समीकरणाचा फायदा घेऊन ते पालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतरसुद्धा चिपळूणमधील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते अजूनही ठाकरे यांच्याबरोबर आहेत.

यातील अनेकांचे पडद्याआड रमेश कदमांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनाही चिपळूण पालिकेत आपले वर्चस्व हवे आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव गुहागरची जागा विक्रांत जाधव यांच्यासाठी ठेवून ते पुन्हा चिपळूणमधून लढू शकतात. भास्कर जाधव यांनी दहा वर्षे, तर रमेश कदम यांनी पाच वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. रमेश कदम आणि भास्कर जाधव या दोघांना मानणारा मोठावर्ग चिपळूण विधानसभा मतदारसंघात आहे.

शहरात रमेश कदम यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे कदम यांना शहराचे तर भास्कर जाधव यांना मतदारसंघाचे नेतृत्व हवे आहे. ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना मानसन्मान आणि सत्तेतील वाटा मिळाल्यास तेही भास्कर जाधव आणि रमेश कदमांचे नेतृत्व स्वीकारण्याची शक्यता आहे. अनेक वर्षाचे राजकीय शत्रू असलेले सचिन कदम आणि भास्कर जाधव एकत्र झाले. त्यामुळे भविष्यकाळात भास्कर जाधव आणि रमेश कदम एकत्र आले तर मतदारसंघातील चित्र वेगळे असण्याची शक्यता आहे.

मला पद आणि आमदारकीचा मोह नाही. राजकारणात राहून जे कार्यकर्ते माझ्याशी जोडले गेले आहेत, त्यांना न्याय देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. भविष्यात कोण एकत्र येतील आणि कोण लांब जाईल, याचीही चिंता नाही. येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी आहे. असे चिपळूनचे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT