Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी(ता.27) दुपारी कोसळला होता.या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.तसेच राजकीय वातावरणही तापलं आहे. मात्र, एकीकडून शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच या प्रकरणी राजकीय नेत्यावर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यासह शिवप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयाची तोडफोड केली होती.या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.पीडब्ल्यूडी ऑफिसची तोडफोड करणं आमदार नाईक यांना भोवण्याची शक्यता आहे.त्यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालवणमध्ये केवळ 8 महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवलेला पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पुतळा कोसळल्यानंतर पुतळ्याच्या कामाविषयी राजकीय नेत्यांकडून शंका उपस्थित केली जात आहे.
आमदार वैभव नाईक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर तिखट प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले,शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळला आहे.शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. कोट्यावधीचा खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता. पुतळ्याचे काम सुरू होते तेव्हा स्थानिक नागरिकांनी देखील तक्रारी केल्या होत्या. पण त्यावेळी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
नाईक म्हणाले, 400 वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेल्या किल्याच्या एकही चिरा ढासळला नाही , पण सहा महिन्यापूर्वीच्या कामाचे ढासळले. या प्रकरणी आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत. शिवप्रेमींनी शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन देखील वैभव नाईक यांनी केले.
पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार आमदार वैभव नाईक यांच्यासह तीन जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आमदार नाईक यांनी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,मंदार केणी आणि शिवप्रेमी यांनी मेढा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात साहित्याची,खिडक्यांची तोडफोड केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.