BJP Sarkarnama
कोकण

BJP Politics : राष्ट्रवादी आमदाराच्या बालेकिल्ल्यात भाजपने भाकरी फिरली; खातूंकडे पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी

Chiplun BJP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार शेखर निकम यांच्या मतदार संघात सध्या भाजपकडून जोरदार हालचाली होताना दिसत आहे.

Aslam Shanedivan

Chiplun News : चिपळूण मतदार संघात हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांचा बालेकिल्ला मानला जात असून सध्या येथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडून पक्षांतर्गत बदल केले जात असून निकम यांचा कट्टर विरोधक असणाऱ्या प्रशांत यादव यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. ज्यानंतर येथे भाजप भक्कम होताना दिसत आहे.

अशातच पक्षाने येथे भाकरी फिरवली असून चिपळूण शहर मंडळ नेतृत्वात अचानक बदल केले आहेत. आशिष खातू यांच्याकडे पुन्हा सूत्रे देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

भाजपच्या चिपळूण शहर मंडळ अध्यक्षपदी मकरंद ऊर्फ आशिष चंद्रकांत खातू यांची अचानक नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान शहर मंडळ अध्यक्ष शशिकांत मोदी यांच्याकडे नगर परिषद गटनेतेपदाची जबाबदारी असल्याने भाजपच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

शहरातील बूथ पातळीपर्यंत पक्षाचे विचार आणि कार्यक्रम पोहोचवणे, वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे आणि संघटनात्मक कामांना गती देणे, अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या शहर मंडळ अध्यक्षाकडे असतात. त्यामुळे आशिष खातू यांच्यासमोर चिपळूण शहरातील पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचे आव्हान असेल.

भाजपच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणानुसार संघटनात्मक रचनेत बदल करण्याचे निर्देश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातही काही बदल करण्यात आले आहेत. चिपळूणमध्ये शशिकांत मोदी यांच्याकडे नगर परिषद गटनेतेपदाची जबाबदारी कायम ठेवून शहर मंडळ अध्यक्षपदी पुन्हा आशिष खातू यांची निवड करण्यात आली आहे.

या बदलामुळे चिपळूण शहरातील भाजपच्या संघटनात्मक नेतृत्वात फेरबदल झाला असून, आगामी काळात पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला कोणती दिशा मिळते, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT