Nitesh Rane BJP .jpg Sarkarnama
कोकण

Mahayuti Government: मुख्यमंत्री फडणवीसांकडून नितेश राणेंची महत्त्वाची मागणी मान्य, महायुती सरकारचा मच्छिमारांसाठी मोठा निर्णय

CM Devendra Fadnavis On Nitesh Rane: महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मोठ्या निर्णयांचा धडाकाच लावला आहे. यातच गेल्या महिन्यांत अतिवृष्टीचा तडाखा बसला.यामुळे शेतीचं,नागरिकांचं,जमिनींचं मोठं नुकसान झालं.

Deepak Kulkarni

Mumbai News: महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मोठ्या निर्णयांचा धडाकाच लावला आहे. यातच गेल्या महिन्यांत अतिवृष्टीचा तडाखा बसला.यामुळे शेतीचं,नागरिकांचं,जमिनींचं मोठं नुकसान झालं. सरकारकडून आता या नुकसानग्रस्त भागांतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू केली आहे.अशातच आता राज्यातील फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारकडून मंत्री नितेश राणेंची मोठी मागणी मान्य करण्यात आली आहे.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना देखील सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत मंत्री नितेश राणे यांनी मागणी केली होती. सरकारकडून मस्त्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यामुळे आता शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांनाही वीज दरात सवलत मिळणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला आहे.पण वीजदरात सवलत मिळवण्यासाठी मत्स्य व्यावसायिकांना एनएफडीबी अंतर्गत नोंदणी बंधनकारक असणार आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छिमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत नुकसानग्रस्तांसाठी व मच्छीमारांच्या बोटींच्या नुकसान भरपाईसाठी 100 कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती.

राज्य सरकारनं मत्स व्यवसायाशी संबंधित प्रकल्पांना कृषी दराप्रमाणं वीज सवलत लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे मच्छिमारांना त्यांच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या विजेच्या खर्चात लक्षणीय कपात होणार आहे. ही मागणी मंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांनी उचलून धरली होती. त्यानंतर महायुती सरकारनं याविषयीचा शासन निर्णय जारी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT