Bhaskar Jadhav News, Eknath Shinde News, Uddhav Thackeray News
Bhaskar Jadhav News, Eknath Shinde News, Uddhav Thackeray News Sarkarnama
कोकण

ठाकरेंशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहिलेल्या भास्कर जाधवांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा धक्का

सरकारनामा ब्युरो

चिपळूण : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर हा प्रयोग काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राबविण्यात आला होता. यात चिपळूण नगरपालिकेचाही समावेश होता. त्यानंतर थेट जनतेतमधून निवडून आल्यामुळे भाजपकडे नगराध्यक्षपद राहिले आणि महाविकास आघाडीकडे विषय समित्या आल्या होत्या. सत्तेचा पॅटर्न पुढेही चालू राहणार की नाही याबाबत सध्या वरिष्ठ वर्तुळात चर्चा सुरु आहेत. (Shivsena | Congress | NCP Latest News)

मात्र त्यापूर्वीच चिपळूण नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला (Shivsena) बाजूला ठेवून कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचे (NCP) सुत जुळले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहिलेल्या गुहागरचे शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण जर आगामी काळात भाजपसोबत मनोमिलन न झाल्यास शिवसेनेपुढे स्वबळावर लढण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

चिपळूण तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहावर पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच पक्ष संघटना वाढीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शवली. त्यानंतर तसा निरोपही बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला कळवण्यात आला.

या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत रणनीती आखण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने संघटन अधिक प्रभावी करण्यासाठी पालिका क्षेत्रासह जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय मंडळ समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबाजवणी करण्याचे निर्देश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. त्यानुसार मंडळ समित्या स्थापनेबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

मात्र यात शिवसेनेसोबत आघाडी करण्यावरुन कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती आहे. सकाळी साडेअकरा वाजता झालेल्या बैठकीला तालुकाध्यक्ष यादव यांच्यासह शहराध्यक्ष लियाकत शाह, सुधीर शिंदे, कबीर काद्री, करामत मिठागरी, सफा गोठे, जीवन रेळेकर, वासुदेव सुतार, गुलजार कुरवले, यशवंत फके, अश्विनी भुस्कुटे, अन्वर जबले, फैसल पिलपिले, निर्मला जाधव, दीपक निवाते, राकेश दाते, महादेव चव्हाण, रूपेश आवले, संगीता लोटे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT