दाभोळ : दापोली तालुका काँग्रेसचे (Congress) तालुकाध्यक्ष अनंत तथा भाऊ मोहिते यांच्या मुलीने शनिवारी (ता. २० नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार सुनील तटकरे (sunil tatkare) यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने दापोलीत खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमात शिवसेनेच्या (shivsena) दापोलीच्या नगराध्यक्षा परवीन शेख याही उपस्थित असल्याने दापोली नगरपंचायत निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. (Congress' Dapoli taluka president's daughter joins NCP)
दापोली नगरपंचायतीची निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना राजकीय पक्षप्रवेशाचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रअध्यक्ष संदीप राजपुरे यांनी राष्ट्रवादीत, तर राष्ट्रवादीच्या माजी सभापती व पंचायत समिती सदस्य ममता शिंदे यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता.
सुतारवाडी (जिल्हा रायगड) येथील खासदार सुनील तटकरे उपस्थितीत आज त्यांच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे दापोली तालुकाध्यक्ष अनंत तथा भाऊ मोहिते यांची कन्या दीपाली मोहिते-पवार, शिवसेनेचे दापोली शहरातील वाहिद शेख, युवा सेनेचे आदिल शेख, सलमान मुजावर, वासिफ हजवानी यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केला.
दरम्यान, या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला दापोलीच्या नगराध्यक्षा परवीन शेख याही उपस्थित असल्याने दापोलीकरांच्या भूवया उंचावल्या आहेत. नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यावर त्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे, जिल्हा सरचिटणीस विकास जाधव, नगरसेवक खालिद रखांगे आदी उपस्थित होते. या पक्ष प्रवेशामुळे दापोलीतील राजकारणात खळबळ उडाले असून येत्या काही दिवसांत असेच फटाके फुटण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक १२ मधून निवडणूक लढवणार?
दापोली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १२, बुरुड आळी, बौद्धवाडी हा प्रभाग अनुसूचित जातीमधील महिलांसाठी आरक्षित झाला असून या प्रभागातून आता दीपाली मोहिते-पवार या निवडणूक लढवतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.