Bhaskar Jadhav Latest News
Bhaskar Jadhav Latest News  Sarkarnama
कोकण

असल्या नोटीशींना आम्ही भीक घालत नाही ; जाधवांनी पुन्हा शिंदेच्या जखमेवर मीठ चोळलं..

सरकारनामा ब्युरो

Bhaskar Jadhav चिपळुण : ज्या धनुष्यबाणाच्या नावावर मोठे झाले तेच धनुष्यबाण शिंदे यांनी गोठवण्याचं महापाप केलंय, याचं दु:खं तर आहेच. पण नियतीने तुम्हाला एक नवीन दार उघडलेलं आहे. नव्या शिवसेनेचा जन्म झाला आहे. आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात नवी शिवसेना उभी राहणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाने आता शिवसेनेचं जे बरवाईट होईल ते उद्धव साहेबांचं असेल. १९६६ साली शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात आता पुन्हा नव्या शिवसेनेचा जन्म होणार आहे. अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी विरोधकांना डिवचलं आहे.

केंद्रिय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. संजय राऊत यांचा दोष काय आहे ? काल कुडाळमध्ये आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस दिली. पण तिथली जनता आपली जात, धर्म, पंथ विसरुन त्यांच्या मागे उभी राहिली. आज अशाच पद्धतीने राजन विचारे आणि बाकी ज्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय त्यांच्या पाठिशी उभे आहात. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी अत्यंत नियोजन पद्धतीने शिवसेनेला दोन पावलं पुढे नेण्याचं काम केलं. पण सातत्याने त्यांच्या नेतृत्त्वावर शंका कुशंका उपस्थित करणं, त्यांच्यावर टीका टीप्पणी करण्याचं काम सुरु होते, अशी खंतही जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.

पण आपली निशाणी धनुष्यबाण आणि शिवसेनेचं नाव गोठवण्याचा प्रयत्न झाला. आता आपल्याला नवे मशाल चिन्ह मिळालं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे. आपल्याला जेव्हा धनुष्यबाणाची निशाणी मिळाली तेव्हापासून बाळासाहेबांनी देव्हाऱ्यात धनुष्यबाणाचीही पुजा केली. पण आज ज्या धनुष्यबाणाच्या नावावर मोठे झाले तेच धनुष्यबाण शिंदे यांनी गोठवण्याचं महापाप केलं. पण मला असं वाटतं नियतीने एक नवीन दार उघडलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाने आता शिवसेनेचं जे बरवाईट होईल ते उद्धव साहेबांचं असेल. १९६६ साली शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला पण तुमच्या नेतृत्त्वात आता पुन्हा नव्या शिवसेनेचा जन्म होणार आहे.

आज शिवसैनिकांना नोटीसा दिल्या जात आहेत. कोणावर ईडीची कारवाई, कोणावर सीबीआयची कारवाई, कोणावर इनकम टॅक्सची कारवाई ... आमच्या संजय राऊतांचा दोष काय आहे. ५५ लाख कशाला म्हणातात, तुम्ही एकेकाला ५० कोटी दिले. पण आज याच ५५ लाखांसाठी तुम्ही संजय राऊतांना जेलमध्ये बसवलं आहे. त्यांनाही शिवसेना सोडा नाहीतर तुम्हाला खुप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल, पण संजय राऊतांनी सांगितलं, मोडेल पण वाकणार नाही आणि शिवसेना, उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

आता पुन्हा एकदा आपल्याला त्याच हिमतीने उभे राहावं लागणार आहे. वैभव नाईकांना आलेली नोटीस असो, वा संजय राऊतांची जेल बघाव लागलं असेल. काल आम्ही कुडाळमध्ये गेलो होतो, तर आमच्या घरावर हल्ले झाले, पण पुर्वीची शिवसेना आठवा, अनेक संकटांतून ही शिवसेना उभी राहिली. आज तुम्ही दिल्लीच्या राज्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे होय आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत, असल्या केसेस आम्ही कचऱ्याच्या टोपलीत टाकून देतो. माझ्या घरावरचा हल्ला असेल. या अशा हल्ल्यांनी न डगमगता, तुम्ही दिल्लीश्वरांना सांगितलं पाहिजे होय आम्ही शिवसैनिक आहोत. एक गावठी म्हण आहे, पाटाच्या बायकोला काठीची भिती काय? नोटीशींची ही कसली भिती, असल्या नोटीशींना आम्ही भिक घालत नाही. अशा शब्दांत भास्कर जाधवांनी पुन्हा भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT