सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोडामार्ग महिला तालुकाध्यक्ष मनीषा गवस यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या (shivsena) शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक अॅड. नीता सावंत-कविटकर, दोडामार्ग तालुका संघटक चेतना गडेकर यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश घेण्यात आला. यामुळे दोडामार्गात महिला संघटनेत शिंदे शिवसेनेची ताकद वाढली आहे. (Dodamarg NCP women taluka president Manisha Gavas joins Shiv Sena)
मळगाव येथील भगवती सभागृहात उद्योगमंत्री उदय सामंत, पालघर लोकसभा व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थित पक्ष संघटना व विविध विकासकामांबाबत मार्गदर्शन सभेत हा पक्षप्रवेश पार पडला. मनीषा गवस यांची शिंदे शिवसेना महिला आघाडीतर्फे दोडामार्ग उपजिल्हासंघटक या पदी नियुक्ती करण्यात आली.
सावंतवाडीतील महिला आघाङीतील सोनाली परब यांची सावंतवाडी उपजिल्हासंघटक, रेश्मा नाईक व रसिका आईर यांची उपतालुका संघटकपदी, तर स्नेहा कुडतडकर यांची विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. दोडामार्गमधून राधिका गडेकर यांची उपशहरपदी, लक्ष्मी करमळकर व करुणा मोर्लेकर यांची उपविभाग, तर अनुष्का गवस, शेफाली टोपले, अस्मिता गवस, शीतल गवस, पूजा गवस, अनिता गवस, अक्षता नाईक यांची शाखा संघटिका म्हणून नियुक्ती करण्यात आली.
यावेळी शिंदे शिवसेनेचे सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले विधानसभा मतदारसंघातील जिल्हा, तालुका आणि शहर शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी प्रमुख, युवा सेना पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.