Nilesh Rane, Deepak Kesarkar
Nilesh Rane, Deepak Kesarkar sarkarnama
कोकण

केसरकर लायकीपेक्षा जास्त बोलू नका : लहान मुलगा म्हणाल्याने निलेश राणे खवळले..

Umesh Bambare-Patil

मुंबई : आपण एका युतीमध्ये आहोत, जेवढी युती टिकविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, तेवढीच ती तुमच्यावरही आहे. तुम्ही शिंदेसाहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची अवस्था मतदारसंघात काय केलीय हे आम्हाला माहिती आहे. कशाला उड्या मारता. मतदारसंघात तुमची काय लायकी आहे हे माहिती आहे. त्यामुळे लायकीत रहायला शिका, असा सज्जद दम भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी दीपक केसरकरांना दिला आहे.

नारायण राणेंची दोन्ही मुलं लहान असून त्यांना समज देण्याची गरज आहे, असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिल्लीत दौऱ्यावर असताना केले होते. याला निलेश राणे यांनी व्टिटच्या माध्यमातून व्हिडीओ प्रसारित करून सडेतोड उत्तर दिले आहे. केसरकरांवर बोलताना निलेश राणे म्हणाले, आपण एका युतीमध्ये आहोत, जेवढी युती टिकविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, तेवढीच ती तुमच्यावरही आहे.

तुम्ही शिंदेसाहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची अवस्था मतदारसंघात काय केलीय हे आम्हाला माहिती आहे. राणेंच्या याच दोन मुलांनी तुमची नगरपालिका घेतली. आमच्याकडे जिल्हा परिषद आहे, तुमचे पंचायत समिती सदस्य आमच्याकडे आहेत, ग्रामपंचायती आहेत. तुमची लायकी आम्हाला माहिती आहे. केसरकर कशाला उड्या मारता. तुमची मतदारसंघात काय लायकी आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे लायकीत रहायला शिका.

तुम्हाला मतदारसंघात कुबड्या मिळाल्या आहेत, त्यावर चाला. नाहीतर मतदारसंघातून तूमचा विषय आटोपलाच होता. तुम्हाला राजकिय जीवनदान मिळाले आहे. त्यामुळे इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका. आम्ही काय गप्प बसणार नाही. ज्या भाषेत सांगाल त्या भाषेत तुम्हाला उत्तर देण्याची आमची तयारी आहे. पण, वातावरण खराब करू नका, युती टिकविण्याची जबाबदारी आपल्या दोघांवर आहे. आपण एका युतीमध्ये आहोत. तुम्ही नवीन नवीन मीडियात बोलायला लागला आहात. तुम्हाला सगळे काय आलेले नाही, ते शिकून घ्या. कोणाला काय बोलायचे हे शिकून घ्या, विचारून घ्या. मगच तोंड उघडा, असा सल्ला त्यांनी केसरकरांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT