ED Sarkarnama
कोकण

Mining Case : गोवा खाण घोटाळ्याचे धागे सिंधुदुर्गात? ईडीचा मोठा हातोडा; भूखंड-फ्लॅट जप्त!

ED Action In Sindhudurg over Goa Mining Fraud Case : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सिंधुदुर्गातील गाळेल (ता. सावंतवाडी) येथे मोठी कारवाई करत चिनी कंपनीच्या फसवणुकीचे ‘सिंधुदुर्ग कनेक्शन’ उघड केले आहे.

Aslam Shanedivan

  1. अंमलबजावणी संचालनालयाने गोवा लोहखनिज खाण फसवणूक प्रकरणात सुमारे २ कोटी २९ लाख रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

  2. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये सिंधुदुर्गातील गाळेल (ता. सावंतवाडी) येथील दोन भूखंड आणि मुंबईतील आलिशान फ्लॅटचा समावेश आहे.

  3. या प्रकरणात चिनी कंपनीला फसवणूक केल्याचा आरोप असून तपास यंत्रणांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

Sindhudurg News : चिनी कंपनीला कोट्यवधींचा गंडा घालून गोव्यातील लोहखनिज खाणींच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका खाण कंपनीच्या प्रकरणात आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कनेक्शन पुढे आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सिंधुदुर्गातील गाळेल (ता. सावंतवाडी) येथील दोन भूखंडांसह मुंबईतील आलिशान फ्लॅट अशी एकूण सुमारे २ कोटी २९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत केली असून, संशयितांनी चिनी कंपनीची तब्बल १३.४२ कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. ईडीच्या पणजी विभागीय कार्यालयाने गोवा आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केलेल्या तपासाची सूत्रे हाती घेत, बँक व्यवहारांच्या तपासातून धक्कादायक प्रकार समोर आणला आहे.

खाणीतून लोहखनिज निर्यातीचे स्वप्न दाखवत चिनी कंपनीकडून गुंतवणूक उभी केली आणि त्यानंतर हा पैसा योजनाबद्ध पद्धतीने स्वतःच्या फायद्यासाठी वळवल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ही कारवाई केली आहे. ईडीने याबाबत संशयितांची नावे उघड केली नसून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य जमीन व्यवहारांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या प्रकरणाची सुरुवात २०१० मध्ये झाली. आरोप असलेल्या खाण कंपनीच्या मालकांनी चीनमधील एका कंपनीला खाणीत भागीदारीचे आमिष दाखवले. आपल्याकडे खाण मालकी हक्क असून मोठ्या प्रमाणावर लोहखनिज निर्यात करता येईल, असे सांगत संबंधित कंपनीकडून २.९५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १३.४२ कोटी) उकळले. या भूलथापांना बळी पडत कंपनीने पैसे वर्ग केले.

मात्र, प्रत्यक्षात ना उत्खनन झाले ना निर्यात करण्यात आली. ईडीच्या तपासात स्पष्ट झाले, की या पैशाचा ‘लेयरिंग’ आणि ‘डायव्हर्जन’ करून तो मालमत्ता खरेदीसाठी वापरला. संपूर्ण पैसे हे संशयितांनी अतिशय पद्धतशीरपणे स्वतःच्या सुखसोईंसाठी आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरले.

विशेष म्हणजे, जिल्ह्यात गाळेल येथे दोन भूखंड खरेदी करून त्या गुन्ह्यातील पैशाची गुंतवणूक जिल्ह्यात केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच मुंबई शहरात आलिशान फ्लॅट संशयितांनी खरेदी केला. त्यामुळे सिंधुदुर्गातही या आर्थिक गुन्ह्याची थेट पाळेमुळे पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

FAQs :

1. कोणत्या प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे?
गोव्यातील लोहखनिज खाण फसवणूक प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे.

2. किती किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे?
सुमारे २ कोटी २९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.

3. कोणत्या ठिकाणी मालमत्ता जप्त करण्यात आली?
सिंधुदुर्गातील गाळेल (ता. सावंतवाडी) येथील भूखंड आणि मुंबईतील एक आलिशान फ्लॅट जप्त करण्यात आला आहे.

4. या प्रकरणात कोणत्या प्रकारची फसवणूक झाल्याचा आरोप आहे?
गोव्यातील लोहखनिज खाणींच्या नावाखाली चिनी कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

5. पुढील कारवाई काय असू शकते?
तपास पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि आणखी मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT