Vinayak Raut, Eknath Shinde sarkarnama
कोकण

शिंदेंचा विनायक राऊतांना मोठा धक्का; जवळच्या व्यक्तीवर दिली महत्त्वाची जबाबदारी

रत्नागिरीत शिंदे गटाला बळ मिळणार?

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर भाजपबरोबर सरकार स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने जिल्ह्यात पाय पसरायला सुरवात केली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिंदे गटाला मिळणारे वाढते समर्थन लक्षात घेता गटाने दुसरी राजकीय इनिंग सुरु केली आहे. गटाची बांधणी मजबूत व्हावी यासाठी शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांचे निकटवर्ती, एकेकाळचे स्वीयसहाय्यक राहुल पंडित (Rahul Pandit) यांची शिंदे गटाच्या रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुखपदी नेमणूक केली. या निवडीने शिंदे गटाला नवी ऊर्जा मिळाली आहे.

जिल्ह्याच्या राजकारणाचे खाचखळगे माहिती असलेल्या उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाला हळूहळू यश येत आहे. शिवसेनेत २०१७ मध्ये आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. सामंत यांची रत्नागिरी तालुक्यात स्वतंत्र कार्यकर्त्यांची फळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही ते या फळीचा कौशल्याने वापर करून युतीच्या उमेदवाराला धुळ चारत होते. आता तर शिंदे गट व भाजप एकत्र आहेत.

तालुक्यात भाजपलाही मानणाराही मोठा वर्ग आहे. त्यामुळे सामंतांनी २०२४ चे बेरजेचे गणित मांडले. शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना समर्थन देणाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे. उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, युवाधिकारी अशा अनेकांना शिवसेनेने पदच्युत केले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि जिल्ह्यात शिंदे गटाला समर्थन वाढत गेले. सामंत उद्योगमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात त्यांचे दणक्यात स्वागत करण्यात आले. शिवसेनेतील काहीजण शिंदे गटात येण्यास इच्छुक असल्यीची चर्चा आहे. चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाणदेखील शिंदे गटाला दाखल झाले आहेत. त्याच्या पाठोपाठ खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय आणि माजी नगराध्यक्ष राहुल पंडित हे शिंदे गटात गेले. सामंत यांच्या माध्यमातून त्यांनी एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यांना दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त केले आहे.

खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय

राहुल पंडित हे रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष आहेत. राऊत यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी टाकण्यात आली होती. शिवाय काही महिन्यांपूर्वी त्यांची शिवसेनेने जिल्हा समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT