Eknath Shinde, Ramdas Kadam Sarkarnama
कोकण

Eknath Shinde : रामदासभाई बोलले ती वस्तुस्थिती; मुख्यमंत्री शिंदेंनीही ओढली कदमांची री

Dapoli Shivsena Meeting : कोकणातील दापोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेत जनसंवादयात्रेवरही टीका केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Konkan Political News : उंटावरून शेळ्या हाकाणारा हा मुख्यमंत्री नाही. जनतेच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा हा मुख्यमंत्री आहे. त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला असता तर आता जनसंवाद यात्रा काढण्याची वेळ आली नसती, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.

रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आपल्या भाषणातून व्यथा आणि वेदना व्यक्त केल्या, त्या खऱ्या आहेत. आज आम्हाला हा निर्णय का घ्यावा लागला असे सांगत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल रामदास कदम जे बोलले ती वस्तुस्थिती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, आम्ही शिवसेना भाजपा युतीमध्ये निवडून आलो सरकार युतीचे व्हायला पाहिजे होते, पण स्वतःच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंनी तसे केले नाही, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी सुनावले. शिवसेनाप्रमुखांचे (Balasaheb Thackeray) आम्हाला शिकवण आहे की अन्याय विरुद्ध पेटून उठा अन्याय सहन करू नका. तेच विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड येथे मिनी एमआयडीसी व 50 बेड हॉस्पिटल उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दापोली येथे केली. कोकण विकासाला कुठेही कमी पडू देणार नाही. चिपळूण येथील वाशिष्ठी नदीत फुकट जाणारे 60 टीएमसी पाणी वापरात आणण्यासाठी काम करत असल्याची महत्त्वाची माहितीही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिली.

दरम्यान, आपल्याच पक्षाचा आमदार संपला पाहिजे, यासाठी कोणी काम केले तर ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. आम्हाला गद्दार म्हणता, मात्र खरे गद्दार तर तेच होते, असा घणाघात रामदास कदमांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार योगेश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT