Eknath Shinde Shiv Sena Rada Case Sarkarnama
कोकण

Eknath Shinde Shiv Sena Rada Case : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 'राडा' प्रकरणात सरकारचा 48 तासांत यू-टर्न! विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती अचानक रद्द; पालघरमध्ये राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra government cancels advocate Sudhir Gupta appointment as special public prosecutor in the Palghar Eknath Shinde Sena workers assault case within 48 hours, sparking political speculation : 18 नोव्हेंबरला अ‍ॅड. सुधीर हरी गुप्ता यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती; 20 नोव्हेंबरला राज्य सरकारकडून नियुक्ती रद्द करण्याची अधिसूचना जारी. निर्णयामागील कारण अस्पष्ट; राजकीय हस्तक्षेपाची चर्चा.

Pradeep Pendhare

Maharashtra Government Decision : रिलीफ रुग्णालय एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राडा प्रकरणात पालघर येथील न्यायालयांत सुरू असलेल्या खटल्यांचे कामकाज पाहण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त करण्यात आलेले अ‍ॅड. सुधीर हरी गुप्ता यांची नियुक्ती अवघ्या दोन दिवसांतच राज्य सरकारने रद्द केली आहे.

विधी व न्याय विभागाने 20 नोव्हेंबरला यासंदर्भातील नवीन अधिसूचना जारी केली असून नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. ही नियुक्ती रद्दमागे राजकीय हालचाली असल्याची चर्चा पालघरमध्ये रंगली आहे.

विधी व न्याय विभागाने 18 नोव्हेंबर 2026 रोजी अधिसूचना काढून अ‍ॅड. सुधीर हरी गुप्ता यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली होती. पालघर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांचे कामकाज चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.

मात्र अवघ्या 48 तासांतच सरकारने (Maharashtra Government) ही नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. 20 नोव्हेंबरला जारी केलेल्या अधिसूचनेत सरकारच्या निर्देशानुसार नियुक्ती रद्द करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. विधी व न्याय विभागाचे कक्ष अधिकारी राजेश एस. मांजरेकर यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यांनीच ही नियुक्तीही केली होती.

विशेष म्हणजे, नियुक्ती आणि नियुक्ती रद्द करण्याची अधिसूचना एकाच विभागाकडून अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने काढण्यात आल्याने या निर्णयाची पालघरच्या न्यायालयीन वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र नियुक्ती रद्द करण्यामागील नेमके कारण अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलेले नाही.

विशेष सरकारी वकील ही नियुक्ती रद्द केली असली, तरी मी आधीही फिर्यादीतर्फे न्यायिक लढा लढत होतो आणि पुढेही राहणार आहे, असे अ‍ॅड. सुधीर गुप्ता यांनी म्हटले आहे. तर राजकीय घडामोडीमुळे ही नियुक्ती रद्द झाली, असावी अशी चर्चा पालघरमध्ये आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT