सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार पनवेल महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे.
शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ ३ जागा मिळतील असा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.
या अंदाजामुळे पनवेलकरांनी शिंदे गटाला नाकारल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
Raigad Exit poll News : महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील सर्व २९ महानगरपालिकांसाठी गुरूवारी चुरसीने मतदान झाले आहे. त्याचप्रकारे पनवेल महानगरपालिकेसाठी देखील मतदान झाले असून याचाही सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्हीचा एक्झिट पोल समोर आला आहेत. ज्यात धक्कादायक माहिती समोर आली असून मतदारांनी कमळ फुलवल्याचा अंदाज दिसत आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील २० प्रभागांमध्ये २४६ उमेदवार रिंगणात असून, बहुसदस्यीय पॅनल पद्धतीने मतदान होणार झाले. प्रभाग क्रमांक ११ व २० मध्ये प्रत्येकी तीन जागांसाठी तर उर्वरित प्रभागांमध्ये चार जागांसाठी मतदारांना मतदान पार पडले. या महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला वा आघाडीला निम्म्याहून अधिक जागा जिंकून बहुमताचा आकडा पार करणे आवश्यक आहे.
नुकताच झालेल्या मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलनुसार येथे पनवलेकरांनी एकनाथ शिंदेंना नाकारल्याचे आता समोर येत आहे. येथे मतदारांनी शिंवसेनेला फक्त ३ जागाच दिल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.
तर भाजपच्या पारडण्यात भरभरून मते टाकल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला असून भाजपला तब्बल ४७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला फक्त १ जागा मिळू शकते.
तसेच या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेस २, ठाकरेंच्या शिवसेनेला ५, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १ आणि मनसेला एक जागा मिळू शकते. तर इतर १८ ठिकाणांवर अपक्षांचा विजय होण्याचा अंदाजही सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान याच पोलनुसार मुंबईत महायुतीला सत्ता मिळवू शकते. भाजपला- ८४, शिवसेना शिंदे गटाला - ३५ जागा मिळू शकतात. तर शिवसेना ठाकरे गटाला - ६५, मनसे-१०, काँग्रेस वंचित- २३, शरद पवार गट- ०२ जागा येऊ शकतात. जर मविआ आणि मनसेची संख्या एकत्र केल्यास ती १०० पर्यंत जाण्याची शक्यता असून मुंबईत महापालिकेची निवडणुकीत कांटे की टक्कर झाल्याचे दिसेल.
८ वर्षांनंतर निवडणुका
पनवेल महापालिका क्षेत्रात पाच लाख 54 हजार 578 मतदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सत्तेत आल्यानंतर पूर्वीच्या प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करून पुन्हा बहुसंख्य सदस्य रचना करण्याचे ठरले. मध्यंतरी ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका रखडल्या पण सर्वोच्च न्यायालयाने 6 मे रोजी थेट निकाल देत चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्यभर आधी नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या आणि आज महानगरपालिकांच्या निवडणुका जवळपास ८ वर्षांनंतर झाल्या.
1. पनवेल महापालिकेचा एक्झिट पोल कोणी जाहीर केला आहे?
हा एक्झिट पोल सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्हीने जाहीर केला आहे.
2. एक्झिट पोलनुसार भाजपची स्थिती काय आहे?
भाजपला बहुमत मिळेल असा अंदाज एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आला आहे.
3. शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा मिळतील असा अंदाज आहे?
शिंदे गटाच्या शिवसेनेला फक्त ३ जागा मिळण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे.
4. पनवेलकरांनी शिंदे गटाला नाकारले का?
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
5. एक्झिट पोल अंतिम निकाल असतो का?
नाही, एक्झिट पोल हा अंदाज असतो; अंतिम निकाल अधिकृत मतमोजणीनंतर स्पष्ट होतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.