मालवणमध्ये निलेश राणे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन आणि पोलिस ठाण्यात दिलेल्या अल्टिमेटमनंतर आचारसंहितेचा पहिला गुन्हा नोंदला गेला.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्यावर कलम 171 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा मालवण पोलिसात दाखल झाला.
राणे यांनी कलेक्टर आणि निवडणूक आयोगाला भेटून गुन्हा नोंद करण्याचा इशारा दिल्यानंतरच कारवाई झाली.
Sindhudurg News : तळकोकणात भाजप आणि शिवसेनेतील वाद काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. अशातच आमदार निलेश राणे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जावून ठिय्या मांडत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह निवडणूक अधिकाऱ्यांनाच धारेवर धरत जाब विचारला. तसेच जर तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करत असाल तर मग मालवणमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल कोणती कारवाई केली याचे उत्तर द्या, जर या प्रकारात क्लिनचीट देण्याचा प्रकार होत असेल तर आपण आयोगालाही कोर्टात खेचू असा दम भरला. यानंतर जिल्ह्यात आचार संहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्षाविरोधातच हा गुन्हा दाखल झाल्याने आता येथे पुन्हा राजकीय वादाल उकळी फुटण्याची शक्यता आहे.
नुकताच निलेश राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकत स्टिंग ऑपरे केले होते. ज्यात पैशांनी भरलेली बॅग समोर आली होती. याचवेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांवर पैसे पुरवल्याचा आरोप केला होता. या प्रकारानंतर येथील वातावरण चांगलेच तंग झाले होते. तर दुसऱ्याच दिवशी निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर निलेश राणे आणखीन आक्रमक झाले होते. तर जो शिवसेनेवर वार करेल त्यांना सोडणार नाही. भाजपच्या लोकांवर आपण आणि आपले कार्यकर्ते लक्ष ठेवतील जेथे संशय येईल येथेच धडा शिकवू असा इशारा दिला होता.
तोच मतदानाच्या आदल्याच (सोमवारी) रात्री मालवण पोलिसांच्या भरारी पथकाला नाकाबंदीत देवगड येथील एका गाडीत लाखांच्या वर पैसे सापडे. ही गाडी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याची असल्याचे समोर आले तर ही बातमी वाऱ्यागच पसरली. यावेळी पोलिसांनी गाडीसह, पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे परब यांच्या ताब्यातील गाडीला नंबर प्लेट नव्हती आणि गाडीत भाजपचे चिन्ह असलेला साहित्य सापडले. यानंतर पोलिसांनी चौकशी करत परब यांच्या एका पदाधिकाऱ्यावरही वेगळ्या कलमाअंतर्गत कारवाई केली होती.
याची माहिती मिळताच सोमवारी मध्यरात्रीच आमदार निलेश राणे यांनी पोलिस ठाणे गाठत भाजप पदाधिकाऱ्यांवर आणि यंत्रणांवर गंभीर आरोप केले. पोलिस तपासात दिरंगाई करत असून एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप केला. भाजप निवडणुकीत पैशाचा वापर करत असल्याचेही राणे पुन्हा म्हणाले. आक्रमक बनलेल्या निलेश राणे यांनी सर्वच पदाधिकारी भाजपचे असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी लावून धरली.
यापूर्वीच्या प्रकरणात संबंधिताना मी पकडून दिले असताना उलट आपल्यावरच गुन्हा दाखल केला. मात्र आता या तिन्ही पदाधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, तो पर्यंत मी येथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. मतदानापूर्वीच जिल्ह्यात दुसऱ्यांदा अशा घडना घडल्याने हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. तर राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले आहे.
दरम्यान यानंतर आज (मंगळवार) मतदानाच्या दिवशी निलेश राणे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी सूर्यकांत पाटील यांची त्यांच्या कक्षात भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरावर टाकलेल्या छाप्याचा अहवाल आणि कारवाई काय केली याचे उत्तर मागितले. तसेच काल जो प्रकार समोर आला त्याच्यावर देखील अधिकाऱ्यांना जाब विचारला. पण जी उत्तर मिळाली ती समाधानकारक नसल्याचे म्हणत त्यांनी प्रशासन काय कारवाई करत नसेल तर वकिलांशी बोलून न्यायालयाचे दरवाजे ठोठावू आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनाच आता प्रतिवादी करू असा इशारा दिला.
या इशाऱ्यानंतर आता पोलिस प्रशासनाने पावले उचलली असून परब यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली असून परब यांच्यावर मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 50, 177 आणि भा.न्या दं. 2023 चे कलम 171 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परब यांच्या ताब्यातील गाडीला नंबर प्लेट नव्हती आणि गाडीत भाजपचे चिन्ह असलेले साहित्य आणि सापडेली रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून जिल्हा संनियंत्रण समितीला याचा अहवाल पाठवला असून गाडीही पोलिसांच्या ताब्यात आहे. तर संदीप उर्फ बाबा परब यांच्यावर कलम 171 नुसार मालवण पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
FAQs :
1. मालवणमध्ये गुन्हा का दाखल झाला?
निलेश राणे यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप झाला आणि त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
2. कोणावर गुन्हा दाखल झाला?
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप उर्फ बाबा परब यांच्यावर कलम 171 अंतर्गत गुन्हा दाखल झाला.
3. निलेश राणे पोलिस ठाण्यात का बसले?
स्टिंगनंतर आरोपींवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी त्यांनी पोलिसांना अल्टिमेटम दिला.
4. निवडणूक आयोगाची भूमिका काय होती?
राणे यांनी आयोगाची भेट घेऊन कारवाईची मागणी केली; त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
5. हा जिल्ह्यातील पहिला गुन्हा आहे का?
होय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचारसंहिता भंगाचा हा पहिलाच नोंदवलेला गुन्हा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.