Anant Geete
Anant Geete Sarkarnama
कोकण

Anant Geete : अनंत गीतेंनी रणशिंग फुंकले; ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसैनिकांना दिली शपथ

सरकारनामा ब्यूरो

Mahad News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज महाडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना माजी मंत्री अनंत गीते यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच शिंदे गटातील आमदारांवरही जोरदार टीका केली. यावेळी अनंत गीते यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिकांना शपथ दिली.

अनंत गीते म्हणाले, "मला एकाने काही प्रश्न विचारले. त्यामध्ये त्यांचा पहिला प्रश्न होता की, तुम्ही महाडमध्ये सभा घेत आहात. मग तुमच्या सभेला महाडमधील नागरीक येतील का? त्यांना माझं सांगण आहे की, प्रश्न विचारणाऱ्यांनी येथे येवून पाहावं. हे मैदान कसं भरलं आहे".

"दुसरा प्रश्न विचारला की, स्नेहल जगताप या प्रवेश शिवसेनेत (ठाकरे गट) करत आहेत. पण त्या तर काँग्रेसच्या आहेत. मग राज्यात महाविकास आघाडी आहे. काँग्रेस हा पक्षही महाविकास आघाडीचा एक भाग आहे, तरीही तुम्ही त्यांना शिवसेनेत प्रवेश कसंकाय देत आहात?"

"त्यांना मी म्हणलं की, 1 मे रोजी झालेली आघाडीच्या वज्रमूठ सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं होतं की, शिवसेनेत गद्दारी झाली त्या दिवशी सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की काँग्रेस तुमच्या सोबत आहे. ज्या काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना शब्द दिला होता. त्याच पक्षातील स्नेहल जगताप या शिवसेनेत प्रवेश करत आहेत", असं ते म्हणाले.

"स्नेहल जगताप यांनी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे फक्त स्नेहल जगतापच नाही तर महाडमधील काँग्रेस देखील आमच्याबरोबर आहे. पण याच महाडमध्ये तीन-तीन गद्दार जन्माला आले आहेत. पण या भूमित त्यांना थारा नाही".

"या तीन गद्दारांना पुढच्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवायची आहे. ही सभा होऊ नये, यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. पण शेवटी सभा झालीच", असं म्हणत त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली. दरम्यान, माजी मंत्री अनंत गीते यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी सभेतील शिवसैनिकांना शपथ दिली.

(Edited by - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT