Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Sarkarnama
कोकण

Shivsena vs Shivsena UBT : कोकणातील 'तळ' आता ढवळून निघणार,'या' गटात शिवसेनेची विजयी घौडदौड ठाकरेंची शिवसेना रोखणार? भाजपच्या भूमिकेकडेही लक्ष

Zilla Parishad and Panchayat Samiti Elections : शिवसेना भाजप युती झाल्यापासून या जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे. मात्र आता आगामी निवडणुकीत भाजप कोणती भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Aslam Shanedivan

  1. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे.

  2. गोलप जिल्हा परिषद गट या वेळी सर्वसाधारण पुरुष गटासाठी आरक्षित झाला असून अनेक उमेदवारांना संधी मिळणार आहे.

  3. शिवसेनेतील फुटीमुळे या गटात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थरारक सामना होणार आहे.

Golap Zilla Parishad Election News : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीच्यादृष्टीने हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे तालुक्यातील गोळप जिल्हा परिषद गट या वेळेला सर्वसाधारण पुरुष गटासाठी आरक्षित झाल्यामुळे खुल्या गटातील अनेक इच्छुकांना नशीब आजमावण्याची संधी मिळणार आहे. या मतदार संघामध्ये अनेक वर्षे शिवसेनेचे वर्चस्व आहे. परंतु शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे या वेळी गटांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा रंगतदार सामना होणार आहे. या गटामध्ये प्रथमच शिवसेनेला वर्चस्व प्राप्त करून देणारे जिल्हा परिषद सदस्य उदय बने यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष असणार आहे.

शिवसेना भाजप युती झाल्यापासून या जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे. 1992 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांचा शिवसेनेतून प्रथमच निवडणूक लढवणारे उदय बने यांनी पराभव केला होता. यानंतर येथे युतीचे वर्चस्व तयार झाले. तेव्हापासून या जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेना उमेदवार कायम प्रत्येक निवडणुकीमध्ये विजय मिळवत आहे.

2022 मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आमदार उदय सामंत यांनी शिंदे गटांमध्ये प्रवेश केल्यामुळे या जिल्हा परिषद गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ठाकरे सेना या विभागांमध्ये बॅकफूटवर गेली. परंतु ठाकरेंशी बांधिलकी असलेले अनेक निष्ठावंत शिवसैनिकल आजही ठाकरेंसोबतच राहिले आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये या गटामध्ये ठाकरे सेनेने आपले वर्चस्व दाखवले. विधानसभा निवडणुकीमध्ये वर्चस्व कायम राहील, अशी शक्यता होती. परंतु ठाकरे सेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार उदय सामंत यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कमी झालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीमध्ये दुपटीने वाढले आणि आमदार उदय सामंत गटाचे वर्चस्व येथे निर्माण झाले. हा गट सर्वसाधारण पुरुष गटासाठी राखीव झाल्यामुळे अनेकजण इच्छुक आहेत. त्या दृष्टीने हालचालींना वेग झाला आहे.

ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व

या जिल्हा परिषद गटांमध्ये गणेशगुळे, गोळप, निरूळ, चांदोर, कोळंबे, फणसोप, भाट्ये, तोणदे या गावांचा समावेश असून, या ग्रामपंचायतीवर सध्या आमदार उदय सामंत गटाचे वर्चस्व आहे.

....तर तिरंगी लढत

या गटामध्ये भाजपचे प्राबल्य कमी असल्यामुळे ते युतीधर्म पाळून शिंदे गटाला पाठिंबा देतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे. मात्र भाजपने लढण्याचा निर्णय घेतल्यास येथे लढत तिरंगी होऊ शकते.

या जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे. अनेकांनी विकासकामांचा ध्यास घेऊन शिंदेगटात प्रवेश केला आहे. आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला हा गड राखणे फार सोपे जाणार आहे.
विलास वारिशे, गोळप उपविभागप्रमुख, शिंदे शिवसेना
मागील पाच वर्षे मानसी साळवी यांनी या गटाचे नेतृत्व केले आहे. मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. निष्ठावंत शिवसैनिक अजूनही ठाम असल्यामुळे पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करून पुन्हा पक्षाचे अस्तित्व निर्माण करणार आहोत.
मंगेश साळवी, माजी सभापती, ठाकरे शिवसेना

FAQs :

1. गोलप जिल्हा परिषद गटाचे आरक्षण कसे आहे?
या वेळी गोलप जिल्हा परिषद गट सर्वसाधारण पुरुष (खुला गट) श्रेणीत आरक्षित करण्यात आला आहे.

2. या गटात कोणत्या पक्षांचे वर्चस्व आहे?
गोलप गटात गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे.

3. या वेळेला शिवसेनेची स्थिती कशी आहे?
शिवसेनेतील फूट झाल्यामुळे दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

4. आरक्षण जाहीर झाल्यानंतर काय हालचाली सुरू झाल्या?
सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला असून इच्छुक कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे.

5. या निवडणुकीचा परिणाम स्थानिक राजकारणावर कसा होईल?
या निवडणुकीत कोणत्या गटाला यश मिळते, यावरून तळकोकणातील पुढील राजकीय समीकरणे ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT