Uday Samant and Uddhav Thackeray  Sarkarnama
कोकण

Gram panchyat Results : रत्नागिरीत ठाकरे गटाचा डंका, सामंतांनी गड राखला

Gram panchyat Results : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सिंधुदुर्गात खाते उघडले..

सरकारनामा ब्यूरो

Gram panchyat Election Results : राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायती निवडणुकांसाठी मतदान करण्यात आले होते. त्याची मतमोजणी सुरु आहे. आत्तापर्यँत हाती आलेल्या निकालात शिंदे गटाने विजयाचं खातं उघडलं आहे. शिंदे गटाच्या श्रावणी रांगणकर या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.

रत्नागिरीत ठाकरे गटाने आत्तापर्यँत 43 ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे. तर शिंदे गटाला 11 तर भाजपला 5 ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे. रत्नागिरीत उद्योग मंत्री उदय सामंत यांचं वर्चस्व कायम राहिल्याचं समोर येत आहे. तर शिवसेना नेते भास्करराव जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात दोन ग्रामपंचायतचा निकाल स्पष्ट झाला आहे. तालुक्यातील आबलोली आणि हेदवी ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाच्या सरपंच विजयी झाले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सिंधुदुर्गात खाते उघडले आहे. देवगडमधील मणची ग्रामपंचायत ठाकरेंच्या शिवसेनेकडे आली आहे. रत्नागिरी- जिल्ह्यातील तिसरा निकाल जाहीर झाला आहे. तिसरी जागा पांगारीतर्फे हवेली ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाने विजय मिळविला आहे.

राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT