Union Minister Ramdas Athawale News : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशभर आंदोलन केले जात आहे. मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरपडताळणी (एसआयआर) आणि ‘फॉर्म ६’वरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांना तात्काळ बडतर्फ करावे, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले ज्ञानेशकुमार यांची पाठराखण करत थेट काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ते रायगड जिल्ह्यातील पाली येथे बोलत होते.
ज्ञानेशकुमार यांनी कोणत्याही दबावाखाली राजीनामा देऊ नये, अशी भूमिका आठवले यांनी मांडली आहे. तर राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांनी आपले नाव बदलून राजीनामा जनता पार्टी' ठेवावे, असा टोला काँग्रेससह विरोधकांना लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरपीआयबाबत आश्वासन दिल्याचे सांगत, पक्षाकडून दोन महामंडळांच्या अध्यक्षपदांसह विधानपरिषदेची एक जागा मागण्यात आल्याचे आठवले यांनी नमूद केले.
एकीकडे देशभर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणी जोर धरू लागली असतानाच विरोधकांवरच आता केंद्रीय मंत्री तुटून पडताना दिसत आहेत. नुकताच यावरून रायगडमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे.
त्यांनी ज्ञानेश कुमार यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता राजीनामा देऊ नये, अशी भूमिका घेताना विरोधकांवर टीका केली आहे. त्यांची ही भूमिका आता ज्ञानेश कुमार यांची पाठराखण करणारी असल्याची टीका होताना दिसत आहे.
आठवले यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची तसेच त्यांना पदावरुन हटविण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना झापले आहे. तसेच राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांनी आपले नाव बदलून राजीनामा जनता पार्टी' ठेवावे," असा टोला लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांचा शब्द
याचवेळी आठवले यांनी, विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरपीआयबाबत आश्वासन दिल्याचे सांगितले आहे. तसेच पक्षाकडून दोन महामंडळांच्या अध्यक्षपदांसह विधानपरिषदेची एक जागा मागितल्याचे देखील स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या मागणीमुळे आता महायुतीतील आरपीआयच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.