Harish Daroda Sarkarnama
कोकण

Harish Daroda death : अजितदादांच्या आमदाराच्या पुतण्याचा मृत्यू, दीड महिन्यांपूर्वी झाली होती अटक; काय घडलं तुरूंगात?

Jail death Maharashtra : हरीश दरोडा हा कल्याणमधील आधारवडी कारागृहात होता. त्याला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती.

सरकारनामा ब्यूरो

थोडक्यात महत्वाचे :

- हरीश दरोडा याला आधारवडी कारागृहात हृदयविकाराचा झटका.

- ठाण्यातील शासकीय रुग्णालयात निधन.

- भात खरेदी घोटाळाप्रकरणी पोलिसांनी केली होती अटक.

Maharashtra jail incident : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्याचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हरीश दरोडा असे त्याचे नाव असून पोलिसांनी दीड महिन्यांपूर्वीच अटक केली होती. आदिवासी विकास महामंडळातील भात खरेदी घोटाळा प्रकरणात हरीश दरोडा दोन वर्षांपासून फरार होता. त्याला मागील महिन्यात अटक झाली होती.

हरीश दरोडा हा कल्याणमधील आधारवडी कारागृहात होता. त्याला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. त्याला कारागृहातच हृद्यविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्याला तातडीने ठाण्यातील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

का झाली होती अटक?

शहापूर तालुक्यातील साकडबाव केंद्रातील तब्बल पाच हजार क्विंटल भाताच्या खरेदीमध्ये सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. ठाणे जिल्ह्यात तब्बल १६ कोटी रुपयांचा घोटाळा मागील दोन-तीन वर्षांत झाला आहे. याप्रकरणी हरीश दरोडा याच्यावर दोन वर्षांपूर्वीच गुन्हा दाखल झाला आहे.

घोटाळा प्रकरणात पोलीस हरीश दरोडाच्या शोधात होते. पण तो फरार होता. पोलिसांनी त्याला मागील महिन्यांत अटक केली होती. त्याआधी त्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. हा पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेचा मुद्दा ठरला होता. हरीश दरोडा हे साकडबाव आदिवासी विविध कार्य़कारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्यासह अन्य चार जणांवरही गुन्हा दाखल झाला होता. भात खरेदीच्या बनावट पावत्या तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT