Vinayak Raut, Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Vinayak Raut News : येथे मशालच चालणार, इतरांची सुपारी वाजणार; विनायक राऊतांचा मनसेला टोला

Poitical News : उद्धव ठाकरेंच्या यांच्या आजच्या सभेने माझ्या विजयावर शिक्कामोर्तब होईल. पैसे घेऊन सुपाऱ्या वाजवणारा कोण आहेत. हे जनतेला माहिती आहे, अशा शब्दात विनायक राऊतांनी मनसेला टोला लगावला.

Sachin Waghmare

Ratnagiri News : कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवरील आरोपाची एकही संधी सोडली जात नाही. आता त्यातच या वादात मनसेने उडी घेतली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या मतदारसंघाकडे लागल्या आहेत. त्यातच खासदार विनायक राऊतांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

रत्नागिरीमध्ये शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) यांच्या आजच्या सभेने माझ्या विजयावर शिक्कामोर्तब होईल. पैसे घेऊन सुपाऱ्या वाजवणारा कोण आहेत. हे जनतेला माहिती आहे, अशा शब्दात त्यांनी मनसेला टोला लगावला. या मतदारसंघात मशालच चालणार आणि इतरांची सुपारी वाजेल, अशी टीका विनायक राऊतांनी (Vinayak Raut) केली. (Vinayak Raut News)

विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची सभा होत असलेल्या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

मातोश्री, बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि कोकण यांचं एक वेगळं नातं आहे. ठाकरे कुटुंबीय कोकणला आपला परिवार समजतात. या परिवारातील लोकांना भेटण्यासाठी, जनतेशी हितगुज करण्यासाठी आणि मशालरुपी आशीर्वाद मागण्यासाठी उद्धव ठाकरे रत्नागिरीत येत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनसेचे नेते अविनाश जाधवचे सर्व धंदे मला माहिती आहेत, जिथे आहात तिथे आधी दिवे लावा आणि नंतर बोला अशी टीका राऊत यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, नारायण राणेंच्या सभेसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई उपस्थित राहणार आहेत. सभेपूर्वी या संदीप देशपांडे आणि सरदेसाई यांनी विनायक राऊतांना आव्हान दिले आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांनी स्वत:राणेंच्या विजयासाठी कंबर कसली आहे. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होणार आहे. शिर्के हायस्कूलजवळील मैदानात ही सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे हे निशाण्यावर असणार असल्याचे समजते.

SCROLL FOR NEXT