Nitesh Rane Case Updates
Nitesh Rane Case Updates  Sarkarnama
कोकण

मोठी बातमी : आमदार नितेश राणेंना उच्च न्यायालयाचा दणका

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्त्यावर हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नितेश राणेंना दणका दिला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिनावर निकालासाठी उच्च न्यायालयाने आजचा दिवस निश्चित केला होता. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती. आता न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यांना अटकेपासून संरक्षण असून, तो मागे घेणार की नाही यावर उच्च न्यायालयात दुपारी सुनावणी होणार आहे. यानंतर राणेंच्या अटकेची कारवाई पोलिसांकडून सुरू होईल. (Nitesh Rane Case Updates)

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या (Sindhudurg DCC Bank) निवडणूक प्रचारामध्ये संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्ण जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर राणे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावरील दोन्ही बाजूचे युक्तीवाद 13 जानेवारीला पूर्ण झाला होता.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेचे प्रचारक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, अशी फौजदारी फिर्याद कणकवली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज यापूर्वी फेटाळला आहे. त्यामुळे आता त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. दरम्यान, बँकेच्या निवडणुकीत राणे गटाला बहुमत मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT