Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray : ....तर बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाहीच : उद्धव ठाकरेंचे सरकारला खुले आव्हान

सरकारनामा ब्यूरो

महाड : बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होण्याबाबत मी पंतप्रधानांना पत्र लिहिले, हे खरं आहे. पण, ते अर्धसत्य आहे. रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणात रोजगार येईल, समृद्धी येईल, असे सांगितले जात आहे. पण आज, तुम्ही स्थानिकांवर तडीपारीची कारवाई करता, उद्या प्रकल्प झाल्यावर काय त्यांना येऊ देणार आहात. एक तर जमिनी उपऱ्यांच्या घशात घातल्या. बारसूत रिफायनरी तर मी होऊ देणार नाहीच. जोपर्यंत कोकणी बांधवाचा विरोध राहील आणि तो जर नाही म्हणाला तर प्रकल्प होऊ देणार नाहीच. कुणीही कितीही पिढी उतरू द्या, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारला दिले. (....I will not allow refinery project in Barsu : Uddhav Thackeray)

काँग्रेसच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी आज महाडमध्ये शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. त्यासभेत माजी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होण्याबाबत मी पंतप्रधानांना पत्र लिहिले, हे खरं आहे. पण, ते अर्धसत्य आहे. कारण, मी लोकांशी बोलेन, कंपनीकडून प्रेझेंटेशन तेथील लोकांना दाखवेन. त्यांनी संमती दिली तरच प्रकल्प होईल नाही तर प्रकल्पाला गेट आऊट करणार होतो.

बारसुबद्दल मी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. पण, सध्या जे गद्दार उपऱ्यांची सुपारी घेऊन नाचत आहेत. कारण त्यांनी मलिदा खालला आहे. मूळमालकांकडून कवडीमोल दराने जमीन घेतल्या. प्रकल्प येणार; म्हणून तुम्हाला माहिती होते. हे नागोबा तिकडे मालक म्हणून बसले आहेत. मी मुख्यमंत्री असताना ठरवलं होतं की. नाणारहून रिफायनरी हाकलली. त्यानंतर मला दिल्लीतून फोन आले. आता तिकडे गेलेले गद्दार येऊन प्रकल्पाबाबत हुजरेगिरी करायचे. तो प्रकल्प विनाशकारी असेल, तर तो गुजरातमध्ये जाऊ दे. त्यावर ते म्हणायाचे रिफायनरीला आता कोणाचा विरोध नाही. वस्त्या आणि गावे नाही. पर्यावरणाची हानी होणार नाही. त्यामुळे माझ्याकडून त्यांनी पत्र घेतलं, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

ठाकरे म्हणाले की, मला आता शंका येते आहे की, आपलं सरकार पाडलं आणि तिकडून संमती आली असेल. मी ठरवलं होतं की, मी स्वतः बारसूत जाईन. लोकांशी बोलेन. कंपनीकडून प्रेझेंटेशन घेऊन आणि लोकांना दाखवेन. त्यांना मंजूर असेल तरच प्रकल्प येईल आणि ते नाही बोलले तर प्रकल्पाला गेट आऊट करणार होतो. पण, आज संपूर्ण पोलिस दल बारसूत आहे. सगळीकडे पोलिस आहेत. एवढा बंदोबस्त चीनच्या सीमेवर लावला असता तर घुसखोरी थांबली असती.

बारसूत गोरगरीबांवर लाठ्या चालवता. कुठली ही लोकशाही. प्रकल्प जर एवढा सोन्यासारखा असेल तर लाठ्या का चालवता आणि पोलिसांना का आणता. मी आज पोलिसांशिवाय जनतेत जाऊन उभा राहिलो तर हे प्रकल्पाचे समर्थक जनतेत जाऊन तो तुमच्या हिताचा आहे, हे का सांगत नाहीत. कोकणात रोजगार येईल, समृद्धी येईल. आज तुम्ही स्थानिकांवर तडीपारीची कारवाई करता, तर उद्या प्रकल्प झाल्यावर काय त्यांना येऊ देणार आहात. एक तर जमिनी उपऱ्यांच्या घशात घातल्या. बारसूत रिफायनरी तर मी होऊ देणार नाहीच. जोपर्यंत कोकणी बांधवाचा विरोध राहील आणि तो जर नाही म्हणाला तर प्रकल्प होऊ देणार नाहीच. कुणीही कितीही पिढी उतरू द्या. संपूर्ण महाराष्ट्र बाररूमध्ये उतरेल, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT