Raj Thackeray sarkarnama
कोकण

Ratnagiri Politics : तळ कोकणात मनसेला डबल धक्का! खेडेकरांनंतर राज ठाकरेंचा मोठा शिलेदारही भाजपच्या वाटेवर?

MNS Leader Advait Kulkarni joins BJP : तळ कोकणात ठाकरे बंधुंच्या पक्षांना खिंडार पडण्याचे सत्र काही केल्या थांबलेले नाही. राज ठाकरे यांनी बडतर्फीची कारवाई करून महिना होत नाही तोच आणखीन एक मोठा धक्का मनसेला बसणार आहे.

Aslam Shanedivan

Ratnagiri News : तळ कोकणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मोठ्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठे पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. नुकताच राज ठाकरे यांनी बडतर्फ केलेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांचा आज (ता.23) पक्षप्रवेश मुंबईत होणार आहे. यामुळे तळ कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा मोठा फायदा भाजपला होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशातच मनसेला आणखीन एक मोठा धक्का बसणार असून माजी शहराध्यक्ष भाजपच्या वाटेवर आहे. त्यामुळे खेडेकर यांच्यासह आता माजी शहराध्यक्षाची ताकदही भाजपच्या मागे स्थानिकच्या तोंडावर उभी राहणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच तळ कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) मोठी कारवाई केली. राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार मनसेचे खेडचे माजी नगराध्यक्ष तथा प्रमुख नेते वैभव खेडेकर यांच्यांसह तिघांवर बडतर्फीची कारवाई केली. यामुळे नाराज झालेले खेडेकर आणि इतर बडतर्फ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे कोकणातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी खेडेकर मंगळवारी (ता.22) दुपारीच 4 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन केले असून आज सर्व पदाधिकाऱ्यांसह ते मुंबईतील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यपदी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. यावेळी मंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणेही उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

आज मुंबईतील भाजप कार्यालयात खेडेकर यांच्यासह रत्नागिरी शहरातील काही प्रमुख पदाधिकारी आणि वाहतूक सेनेचे पदाधिकारीही भाजपमध्ये दाखल होण्यासाठी होण्याची शक्यता आहे. यादरम्यान आता मनसे माजी शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांचेही नाव आता समोर येत असून ते देखील भाजपमध्ये आजच प्रवेश करणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे खेडेकर यांच्यासह राज ठाकरेंचा आणखी एक शिलेदार मनसेची साथ सोडणार आहे.

काहीच महिन्यांच्या पूर्वी कुलकर्णी यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते पक्षापासून दूरावले होते. पण आता स्थानिकच्या तोंडावर ते पुन्हा राजकारणात सक्रीय होत असून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे खेडच्या राजकारणाला धक्कादायक वळण लागण्याची शक्यता असून भाजपच्या गळाला मोठे मासे लागले आहेत.

खेडेकर यांची प्रतिक्रिया

दरम्यान मुंबईला निघण्यापूर्वी खेडेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. ते म्हणाले होते की, “ मी गेल्या 30 वर्षापासून जी मेहनत घेतली. त्याला आता कुठे यश येत होते. पण आता मी मनसेसोबत नसेन. माझी मेहनत फळाला येत असतानाच माझ्यासोबत अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

खेडचे राजकीय समीकरणं बदलणार?

या महिन्याच्या सुरूवातीलाच राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार वैभव खेडेकर यांच्यासह तीन जिल्हाध्यक्षांवर हकालपट्टीची कारवाई पक्षाने केली होती. आता खेडेकर यांच्यासह तीनही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असून यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. या प्रवेशामुळे तळ कोकणात भाजपची ताकद वाढेल. होऊ घातलेल्या स्थानिकच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होऊ शकतो, असाही अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय.

FAQs :

1. वैभव खेडेकर कोण आहेत?
ते खेडचे माजी नगराध्यक्ष असून नुकतेच भाजपमध्ये प्रवेशले.

2. अद्वैत कुलकर्णी कोण आहेत?
ते खेडचे माजी शहराध्यक्ष असून आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

3. हे दोन्ही नेते कोणत्या पक्षातून आले?
हे दोन्ही नेते राज ठाकरे यांच्या मनसेमधून भाजपमध्ये जात आहेत.

4. या प्रवेशामुळे कोणत्या पक्षाला मोठा धक्का बसणार आहे?
मनसेला मोठा धक्का बसणार आहे.

5. या घडामोडींचा निवडणुकांवर कसा परिणाम होईल?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणखी बळकट होईल आणि मनसेचे स्थान कमजोर होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT