Kiran Samant Sarkarnama
कोकण

कोकणात पुन्हा मोठा राजकीय भूकंप : उद्योगमंत्र्यांच्या भावाची राजकारणात एन्ट्री?

राजकीय बुद्धिबळामध्ये कोणती चाल कधी खेळायची, हे चांगलेच अवगत असते, अशी त्यांची ख्याती आहे.

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : रत्नागिरीच (Ratnagiri) नव्हे तर कोकणचे (Konkan) राजकाराण ढवळून काढणारे आणि राजकीय पडद्यामागील वजीर, किंगमेकर म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते किरण ऊर्फ भैय्या सामंत यांची लवकरच राजकारणात एंट्री होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील घडामोडींवर त्यांचा राजकारणातील प्रवेश अवलंबून आहे. ही घडमोडदेखील पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणात भूकंप घडवणारी असेल, असे संकेत मिळत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे. (Industries Minister Kiran Samant's brother Kiran Samant will enter politics)

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांची राजकारणात एंट्री होण्याची शक्यता वाढली आहे. राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर जोरदार राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेची यात मोठी पडझड झाली. शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार एकनाथ शिंदे गटामध्ये सामिल झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेल्या अनैसर्गिक युतीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी भाजपशी असलेल्या नैसर्गिक युतीच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, पडझडीतून सावरण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मैदानात उतरावे लागले आहे. शिवसेना सावरण्याचा प्रयत्न करत असताना एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेना गटाने राज्यात चांगलेच पाय पसरले आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला चांगले यश मिळाल्याचा दावा आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकांचा विचार करून शिंदे गटाने पावलं टाकायला सुरवात केली आहे. किरण सामंत हे राजकारणातील वजीर आणि किंगमेकर म्हणून ओळखले जातात. त्यांची कार्यपद्धत धडाकेबाज आहे. राजकीय बुद्धिबळामध्ये कोणती चाल कधी खेळायची, हे चांगलेच अवगत असते, अशी त्यांची ख्याती आहे. सिंधुरत्न योजनेच्या सदस्यपदी नुकतीच किरण सामंत यांची नेमणूक झाली आहे. गेली अनेक वर्ष किरण सामंत सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट बोर्डवर ते सदस्य आहेत. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यातील विकासकामांसाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात. शिंदे गटाची कोकणात मजबूत बांधणी करण्यासाठी किरण सामंत आता राजकारणाच्या मैदानात एन्ट्री करणार असल्याची शक्यता व्यक्त आहे.

शिंदे गटाची ती चाल यशस्वी झाली तर एन्ट्री मागे पडणार

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून शिंदे गटाकडून खासदारकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. मात्र मेख वेगळीच आहे. जिल्ह्यातील एका मोठ्या अपेक्षित राजकीय घडामोडीवर त्यांची राजकारणातील एन्ट्री अवलंबून आहे. शिंदे गटाने खेळलेली चाल यशस्वी झाली, तर ही एन्ट्री मागे पडू शकते. मात्र, ती अयशस्वी झाली तर किरण सामंतांची राजकारणात दणक्यात एन्ट्री होणार असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT