Uday Samant and Vinayak Raut  Sarkarnama
कोकण

Shinde Group Vs Thackeray Group: उदय सामंतांचे विनायक राऊतांना थेट 'चॅलेंज'; 'पुढचा खासदार कोण होतं ते बघूच..'

Uday Samant and Vinayak Raut : रत्नागिरी जिल्ह्यात देखील शिवसेना आणि ठाकरे गटात संघर्ष वाढला

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News : राज्याच्या राजकारणात शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्ष पाहायला मिळत असून शिवसेनेच्या आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण पाहायला मिळते. आता रत्नागिरी जिल्ह्यात देखील शिवसेना आणि ठाकरे गटात संघर्ष वाढला असून उद्योगमंत्री उदय सामंतांनी खासदार विनायक राऊत यांना थेट 'चॅलेंज' करत 'पुढचा खासदार कोण होतं ते बघूच..', असे म्हटले आहे.

"माझ्यावर चांगले संस्कार झाले म्हणून मी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नाही. मात्र, पाणी डोक्यावरून गेले तर आपण गप्प बसणार नाही. विधानसभेच्या आधी चार महिने लोकसभेची निवडणूक आहे. तेव्हा मी बरोबर होतो, म्हणून खासदारकी मिळाली. आता पुढचा खासदार कोण होतं ते बघू", अशी टीका उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर केली.

"आमच्या जीवावर निवडून आलेले आता कृतज्ञता म्हणून आमच्यावर टीका करत आहेत. पण त्यांना देखील करारा जवाब मिळेल", असा इशारा सामंतांनी दिला. वि.दा.सावकर नाट्यगृहामध्ये आयोजित शहर शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

याआधी ठाकरे गटाचा मेळावा झाला होता, त्यामध्ये उदय सामंत यांच्यावर टीका करण्यात आली होती. तर आता करारा जवाब मिलेगा, अशी जाहिरात करून उदय सामंत यांनी हा मेळावा घेतला होता.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT