Ajit Pawar | Bharat Gogawale Sarkarnama
कोकण

Bharat Gogawale On Ajit Pawar:''अजित पवार मुख्यमंत्री होणं शक्य नाही,कारण...''; शिंदे गटाच्या गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics Bharat Gogawale On Ajit Pawar : ''2024 ला काय आत्ताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकायला तयार आहे असं अजित पवार म्हणाले होते.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वत: माध्यमांसमोर येत भाजप प्रवेशाच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं होतं. तरीदेखील पवारांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा अद्याप थांबलेल्या नाहीत. त्यातच त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकण्यास आजही तयार असल्याचं विधान केलं होतं.

आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याचं वक्तव्य केल्यामुळे भाजप- शिवसेना युतीत नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. आता शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर सूचक विधान करतानाच भाजपच्या विखे पाटलांनाही प्रत्युत्तर दिलं आहे.

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले(Bharat Gogawale) यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी मोठा दावा केला आहे. गोगावले म्हणाले,अजित पवार म्हणत आहे की, आता जर मुख्यमंत्री झालो तर बरं होईल. पण आता तसं शक्य नाही. कारण जे आमचं ठरलं आहे ते ठरलं..त्याच्यात आता बदल नाही असं ते म्हणाले आहेत.

विखे पाटलांना प्रत्युत्तर...

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील(Radhkrishna Vikhe Patil) यांनी देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य केले होते. त्यावर भाष्य करताना गोगावले म्हणाले,"बऱ्याच लोकांच्या मनात वेगवेगळं असते. पण जो कार्यरत असतो तोच खरा मुख्यमंत्री असतो. अजित पवार देखील म्हणाले की, मी मुख्यमंत्री व्हावं असं माझ्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.

पण युतीमध्ये जे काही ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पक्षाच्या पद्धतीने बोलणारच, पण त्याला काही हरकत नाही. त्यावर आम्ही काही बोलत नाही. त्यांनी त्याचं काम करावे आम्ही आमचं काम करतोय," असेही भरत गोगावले म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले होते?

''2004 सालीच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता. 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल एवढ्या जागांची संख्या जनतेने राष्ट्रवादीला दिली होती. काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. पक्षाची शिस्त राहावी, यासाठी वरिष्ठ सांगतील तसं ऐकावं लागतं. तसेच यावेळी त्यांनी 2024 ला मुख्यमंत्रीपदाचा दावा ठोकणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले,''2024 ला काय आत्ताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकायला तयार आहे असं सूचक विधान पवार यांनी केलं होतं.

विखे पाटील काय म्हणाले?

भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका शिर्डी येथील एका कार्यक्रमात तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले, 'हे स्पष्ट असून, देवेंद्र फडणवीस आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. सध्याच्या आमच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे देखील चांगले नेते आहे. पण आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस हेच असल्याचं विखे पाटील म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेले शरद पवार हे संपूर्ण राज्याला संभ्रमात टाकले आहे. पण आता अजित पवार यांनी शरद पवारांना देखील संभ्रमात टाकले आहे. त्यामुळे कोणाच्या मनात काय चालले आहे कळत नाही असंही ते म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT