Jitendra Awhad.jpg sarkarnama
कोकण

ऑस्ट्रेलिया हे नाव कसे पडले? या वादात जितेंद्र आव्हाडांची उडी!

गृहनिर्माण विकासमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी श्री श्री रवीशंकर यांच्या एका विधानावर टीका केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात एक साधक त्यांना ऑस्ट्रेलिया देशाची माहिती विचारत आहे. त्याला रवीशंकर यांनी दिलेले उत्तर सोशल मिडियात चर्चेचा विषय ठरले आहे. त्यावरून दोन्ही बाजूंची मंडळी तुटून पडली आहेत. यात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही भाग घेऊन रवीशंकर यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. ऐन दिवाळीत आव्हाड यांनी बार उडवून दिला आहे. त्यांनी या उत्तरात वापरलेल्या भाषेबद्दलही आक्षेप घेण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियातील एका शिबिरात साधकाने गुरूजींना एक प्रश्न विचारल्यानंतर हे सारे सुरू झाले. त्या काळातील (पुराण काळातील) योद्ध्यांना ब्रह्मास्त्र, पशुपतीअस्त्र अशा प्रकारची अस्त्रे कुठे मिळत असावीत, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना रवीशंकर यांनी ऑस्ट्रेलियाचे उदाहरण दिले. ते म्हणाले ``ऑस्ट्रेलिया देशाचे मूळ तुम्हाला माहिती आहे का? अस्त्रालय या नावावरून हे नाव आले आहे. अस्त्रालयावरून ऑस्ट्रेलिया हे नाव पुढे सुरू झाले. या देशात सर्वात शक्तिशाली अस्त्रे ठेवण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाच्या मधोमध एक वाळवंट आहे. काही शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार येथे हजारो वर्षांपूर्वी आण्विक स्फोट झाला असावा. या वाळवंटात ना कोणता वृक्ष आहे ना काही जीवजंतू जिवंत आहेत. ऑस्ट्रेलियाची लोकवस्ती ही समुद्रकिनाऱ्यांलगत आहे. त्या काळात असे घडले असेलही. घडले नसेल तर कल्पना तर केली आहेच की. कल्पनेतून तर जग जन्मते. कोणीतरी पक्ष्यांपासून विमानाची कल्पना केली. तसेच ब्रह्मास्त्राची कल्पनाही त्या काळी केली गेली असेल.``

ऱवीशंकर यांचे हे उत्तर बरेच चर्चेत आहे. त्यात आव्हाड यांनी आपल्या माहितीची भर घातली आहे. ते देताना त्यांनी वेगळेच उदाहरण दिले आहे. ट्रीपल श्री म्हणजेच श्री श्री श्री रविशंकर च्या म्हणण्यानुसार अस्त्रे ठेवत होते म्हणुन त्या जागेचे नाव अस्त्रालय-आस्ट्रेलिया असे पडले...! या नुसार नकाशात लंडन आणि अंडमान जवळ जवळ पाहिजेत...!! जास्त स्पष्ट लिहायचे तर अंडमान लंडन च्या खाली पाहिजे...!!!

त्यांच्या या उत्तरावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT