Bhimashankar Karjat Torrent Power Project:  Sarkarnama
कोकण

NCP News: कर्जतमधील 'टोरंट' प्रकल्प वृक्षतोडीविरोधात सत्तेतील राष्ट्रवादीही मैदानात; एकाच तालुक्यात इतके प्रकल्प कशासाठी?

Bhimashankar Karjat Torrent Power Project: टोरंट कंपनीच्या साई डोंगर-१ जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मंगळवारी (दि. २७) साई डोंगर परिसराला भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला.

सरकारनामा ब्यूरो

कैलास म्हामले-

Karjat News : टोरंट कंपनीच्या साई डोंगर-१ जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मंगळवारी (दि. २७) साई डोंगर परिसराला भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी एकाच तालुक्यात अनेक धरणे आणि ऊर्जा प्रकल्प कशासाठी, असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली.

यावेळी पंचायत समिती सभापती नमिता सुधाकर घारे, स्थानिक तालुकाप्रमुख दीपक श्रीखंडे, पाली तर्फे कोथळ खलाटी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच संजना पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-खालापूर मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. वृक्षतोडीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत प्रकल्पाविरोधातील भूमिका मांडण्यात आली.

कर्जत तालुक्यात कोंढाणे, पोशीर आणि शिलार धरणांसह टाटा व टोरंटचे जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहेत. तसेच खालापूर परिसरातील मोरबे आणि पाली-भूतिवली धरणांसारख्या प्रकल्पांमुळे पर्यावरणावर परिणाम होण्याची भीती घारे यांनी व्यक्त केली. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्यास वनसंपदा आणि स्थानिक पर्यावरणाचे नुकसान होईल, असेही ते म्हणाले.

“इथला आंबा किंवा जांभूळ दुसरीकडे लावून या परिसरातील जंगलाची भरपाई होऊ शकत नाही,” अशी टीका त्यांनी केली. वृक्षतोड सुरू करण्यापूर्वी शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक होते. मात्र, ग्रामस्थांचा विरोध असतानाही वृक्षतोड सुरू करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने असून, बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत प्रकल्पाला विरोध कायम राहील, असे घारे यांनी स्पष्ट केले. कर्जतच्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT